एकनाथ शिंदे म्हणाले; सर्वांना वाटले होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, पण…

टीम लय भारी

मुंबई : माझ्यासोबत 50 आमदार होते. भाजपकडे 115 आमदार होते. सर्वांना वाटले होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदेला काहीच मिळणार नाही. पण भाजपने मला संधी दिली. मी मुख्यमंत्री झालो, असे प्रतिपादन नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची आज नियुक्ती झाली. नार्वेकर यांच्या अभिनंदन ठरावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याही नियुक्तीबद्दल भावना व्यक्त केल्या.एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. देशातल्या नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय भाजपने घेतला, असे ते म्हणाले.

मी एका आमदाराला स्वतः चार्टर विमान करून पाठवून दिले. आम्ही कोणावरही जबरदस्ती केली नाही. भाजपकडे 115 आमदार आहेत. तरीही त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, अशा शब्दांत शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : 

राज्यपालांच्या भूमिकेवर वर्षा गायकवाड यांनी साधला निशाणा

शिवाजीराव आढळराव – पाटील हे शिवसेनेतच, त्यांची हकालपट्टी नाही!

राहूल नार्वेकर ठरले सर्वात ‘तरुण‘ विधानसभेचे अध्यक्ष

नवेली कांबळे

Naveli Kamble is a reporter/ sub editor.

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago