35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईशिवाजीराव आढळराव - पाटील हे शिवसेनेतच, त्यांची हकालपट्टी नाही!

शिवाजीराव आढळराव – पाटील हे शिवसेनेतच, त्यांची हकालपट्टी नाही!

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली अशा आशयाची बातमी आजच्या सामना दैनिकातून प्रसिद्ध करण्यात आली, मात्र ही वृत्त अनवधानाने प्रसिद्ध करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

सामनाच्या आजच्या (दि. 3 जुलै) अंकात शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली.दरम्यान, पाटील यांच्या हकालपट्टीच्या बातमीने शिवसेनेत एकच खळबळ उडाली. त्यावर स्पष्टीकरण देत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात हे वृत्त अनावधानाने छापण्यात आल्याचे म्हटले आहे.

पत्रकात शिवसेना उपनेते श्री. शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेनेतच असा मजकूराचा विषय ठेवून याबाबत असे म्हटले आहे की, आज दि. 3 जुलै, 2022 रोजी सामना दैनिकात आलेली बातमी अनवधानाने छापण्यात आलेली असून श्री. शिवाजीराव आढळराव – पाटील हे शिवसेना  उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

अखेर, या संपुर्ण घडामोडीवर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने विश्लेषण करून शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्थान कायम असल्याचे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा : 

राज्यपालांच्या भूमिकेवर वर्षा गायकवाड यांनी साधला निशाणा

शिवाजीराव आढळराव – पाटील हे शिवसेनेतच, त्यांची हकालपट्टी नाही!

एकनाथ शिंदे म्हणाले; सर्वांना वाटले होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, पण…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी