31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयराहूल नार्वेकर ठरले सर्वात ‘तरुण‘ विधानसभेचे अध्यक्ष

राहूल नार्वेकर ठरले सर्वात ‘तरुण‘ विधानसभेचे अध्यक्ष

टीम लय भारी

मुंबई : नाना पाटोळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाने कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. आज झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात त्यांची निवड झाली. ते पेशाने वकिल आहेत. देशातील सर्वांत तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली.

विधानसभा आमदार म्हणून पहिल्याच कार्यकाळात अध्यक्ष होण्याची संधी त्यांना चालून आली. नार्वेकरांचे सासरे रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. सातारा जिल्ह्यातील निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29 वे वंशज आहेत. ते 1995 साली सर्वप्रथम फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

निंबाळकर 22 अपक्षांना एकत्र करत तत्कालीन शिवसेना भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला होता. युती सरकारच्या त्या राजवटीमध्ये निंबाळकर हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते.

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. नार्वेकरांना समाजकारणाचा वारसा आणि राजकीय वारसा आहे. ते उच्च न्यायालयात वकिली करतात. मच्छिमार बांधवांसाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे. मध्यमर्गीय ते उच्चभ्रु लोकांचा मतदार संघ अशी ओळख असलेल्या कुलाबा मतदार संघातून नार्वेकर निवडून आलेले आहे. त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते उत्तम वक्ते आहेत. अनेक शैक्षणीक सामाजीक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.

हे सुध्दा वाचा:

जयंत पाटील यांनी राज्यपालांना ‘गोंजारत‘ चिमटे काढले!

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंच्या घराचा परिसर झाला ‘चकाचक

तुमच्या ‘अश्रूंशी’ मी गद्दारी करणार नाही

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी