31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक ! फसवणुकीसाठी तयार केले जातेय पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट

धक्कादायक ! फसवणुकीसाठी तयार केले जातेय पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट

पुणे : पोलीस आयुक्त, तसेच पोलीस अधिकारी (Police Officer) यांच्या नावाने फेसबुकचे (Fake Facebook Account) अकाऊंट किंवा पेज तयार करुन त्यावरून पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त (police Commissioner) कृष्ण प्रकाश (krushna Prakash) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला होता. दिवसेंदिवस पाय पसरत असलेले सायबर गुन्हेगार थेट पोलिस आयुक्त आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुक पेज किंवा अकाऊंट तयार नागरिकांची फसवणूक तसेच सायबर क्राईमचे प्रकार सध्या वाढले आहेत. शहरातील नागरिकांनी मागील वर्षी 3008 तर यंदाच्या चालू वर्षात 11 महिन्यात 3581 तक्रार अर्ज सायबर सेलकडे दाखल केले आहेत. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांत 1250 थेट तर 2331 अर्ज ऑनलाइन असे एकूण 3581 तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.

हिंजवडी-माण माहिती तंत्रज्ञान (IT) पार्क तसेच तळवडे सॉफ्टवेअर पार्कमुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जगभरात पोहचले आहे. संगणक तज्ज्ञांसह अनेक आयटीयन्स शहरात वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. त्यांना टार्गेट करण्याचा उद्योग सायबर गुन्हेगार करत आहेत.

कोरोना काळात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात अधिकच वाढ झाली आहे. सर्वसामान्यांसह आयटी कर्मचाऱ्यांना देखील गंडा घातला जात आहे. कर्ज देण्याचे आमिष दाखवून, विविध वस्तू खरेदी-विक्रीचा बहाणा करुन आणि भावनीक मुद्दा पुढे करुन नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

कसा घातला जातो गंडा

नागरिकांना फोन करून बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून त्यांना एटीएम कार्ड, पेटीएम खाते अपडेट करायचे आहे, अशी बतावणी करुन नागरिकांच्या बँक खात्याची माहिती घेतली जाते. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील पैशावर डल्ला मारला जातो. तसेच बक्षीस लागले आहे, बोनस देण्यात येत आहे, असे मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जाते.

2 वर्षात 417 तक्रारींचा निपटारा

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे थेट तसेच ऑनलाईन तक्रारी आल्या आहेत. यंदाच्या वर्षी आलेल्या एकूण 3581 तक्रारीपैकी 108 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर 995 तक्रार अर्ज संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच मागील वर्षी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत आलेल्या 3008 तक्रार अर्जापर्यकी 309 अर्जांचा निपटार सायबर सेलने केला आहे. तर 2699 अर्ज पोलीस ठाण्यांकडे वर्ग केले आहेत.

तर थेट बोलणे करावे – पोलीस

सोशल मीडियावरून पैशांची मागणी होत असले तर संबंधित व्यक्तीशी थेट बोलणे करावे. पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे बँक खाते, मोबाईल फोन नंबर आदीची खात्री करुन घ्यावी. तसेच कोणत्याही अमिषाला बळी न पडता अशा कोणताही आर्थिक व्यवहार करु नये. त्याचप्रमाणे अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये आणि अधिक सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या अकाऊंटची सेटींग करावी, असे गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी