33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रपवारांच्या भेटीनंतर शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट

पवारांच्या भेटीनंतर शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट

टीम लय भारी

मुंबई :- केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कायदे मान्य नाहीत. राज्यशासनाने याबाबतीत ठोस भूमिका मांडावी यासाठी शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले (A delegation of farmers and social organizations called on Ajit Pawar).

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायदे शेतकऱ्यांना मान्य नाहीत. राज्य सरकारने आपल्या सोबत उभे राहावे. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. यासाठी आज शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यांच्या सोबत विषयावर चर्चा केली आपल्या मागण्या सांगितल्या. राज्य सरकारने शेतकऱ्यांसोबत उभे राहावे. यानंतर शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले (A delegation of farmers and social organizations made a statement of demands).

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शरद पवार लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मोदींचे अच्छे दिनवर राहुल गांधींचा फटकार, देशातील सुशिक्षित तरुण रिक्षावाले भजीवाले झाले

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या भेटीच्या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी मान्यवरांचा समावेश होता.

farmers and social organizations called on Ajit Pawar
उपमुख्यमंत्री उध्दव ठाकरे

राष्ट्रवादीची विरोधी पक्षावर खोचक टीका; तुम्ही फक्त भावनिक मुद्द्यांचे राजकारण करा

Sharad Pawar, Uddhav Thackeray Meet Amid Reports Of Maharashtra Alliance Strain

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेवेळी शिष्टमंडळाच्या नेत्यांना दिला (Deputy Chief Minister Ajit Pawar gave confidence to the leaders of the delegation during the discussion).

तसेच आज शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली होती. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांवर चर्चा केली. या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित होते. शरद पवारांनी कृषी संघटनांच्या प्रतिनिधींनी आश्वासन दिले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी