तेलंगणाजवळ गोदावरी एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले; जीवितहानी नाही

विशाखापट्टणमहून हैदराबादला प्रस्तान करणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले आहेत. तेलंगणा येथील बीबीनगर ते घाटकेसर दरम्यान ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचप्रमाणे “प्रवाश्यांना त्याच ट्रेनने रुळावरून घसरलेले डबे वेगळे करून सोडले जात आहे,” असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Godavari Express’s 6 coaches derailed near Telangana)

या प्रकरणानंतर संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, विशाखापट्टणम येथून एक अपघात निवारण ट्रेन शिवलिंगपुरम स्थानकाकडे रवाना करण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अनुप सत्पथी आणि अभियंत्यांच्या पथकाने पुनर्संचयित कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. रुळावरून घसरलेला डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला आणि त्याला किरंदुल या गंतव्यस्थानी पाठवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रातिनिधिक छायाचित्र : तेलंगणा येथील बीबीनगर ते घाटकेसर दरम्यान रुळावरून गाडी घसरली
प्रातिनिधिक छायाचित्र : गोदावरी एक्सप्रेसचे आपघातादरम्यान झालेले नुकसान

रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 18 जानेवारी रोजी कोट्टावलासा-अराकू सेक्शनमधील शिवलिंगपुरम स्थानकावर विशाखापट्टणम-किरंदुल ट्रेनच्या सामान्य डब्याची चाके रुळावरून घसरली होती. मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना झालेल्या या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये. दरम्यान संबंधित प्रकरणावरून ट्रेनचे घसरण्याचे नेमके कारण हे तीव्र प्रवण विभाग, अतिशय अवघड भूभाग किंवा तापमानात झालेली घसरण असू शकते असा अंदाज बाळगण्यात आला आहे, याविषयी अधिक तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाणून घ्या

लवकरच, प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमध्ये चित्रपट, संगीताचा आनंद मोफत घेता येणार

पुढील तीन वर्षांत भारतात “400 वंदे भारत ट्रेन” येणार

Team Lay Bhari

Recent Posts

महाराष्ट्रात मराठी माणसालाच No Welcome

जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच…

7 mins ago

‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’: शांतीगिरी महाराज

नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj)…

38 mins ago

ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा, २२२ खातेदारांच्या लॉकरमधून ५ कोटींचे दागिने लंपास

नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे…

1 hour ago

तापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…

1 hour ago

संकटग्रस्त अजित पवारांना हवाय मनोज जरांगे पाटलांचा आधार

अजितदादांचे धाकटे सुपूत्र जय पवार थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. जय यांनी हेलिकॉप्टर…

2 hours ago

उन्हाचा तडाखा वाढला मात्र शहरात स्वाईन फ्लू नियंत्रणात

एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा (Heat wave intensifies) मोठा होता त्यात शेवटच्या आठवड्यात पारा ४३ अंशावर…

2 hours ago