विशाखापट्टणमहून हैदराबादला प्रस्तान करणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले आहेत. तेलंगणा येथील बीबीनगर ते घाटकेसर दरम्यान ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचप्रमाणे “प्रवाश्यांना त्याच ट्रेनने रुळावरून घसरलेले डबे वेगळे करून सोडले जात आहे,” असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Godavari Express’s 6 coaches derailed near Telangana)
या प्रकरणानंतर संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, विशाखापट्टणम येथून एक अपघात निवारण ट्रेन शिवलिंगपुरम स्थानकाकडे रवाना करण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अनुप सत्पथी आणि अभियंत्यांच्या पथकाने पुनर्संचयित कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. रुळावरून घसरलेला डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला आणि त्याला किरंदुल या गंतव्यस्थानी पाठवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.


रेल्वे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 18 जानेवारी रोजी कोट्टावलासा-अराकू सेक्शनमधील शिवलिंगपुरम स्थानकावर विशाखापट्टणम-किरंदुल ट्रेनच्या सामान्य डब्याची चाके रुळावरून घसरली होती. मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना झालेल्या या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये. दरम्यान संबंधित प्रकरणावरून ट्रेनचे घसरण्याचे नेमके कारण हे तीव्र प्रवण विभाग, अतिशय अवघड भूभाग किंवा तापमानात झालेली घसरण असू शकते असा अंदाज बाळगण्यात आला आहे, याविषयी अधिक तपास सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाणून घ्या
लवकरच, प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमध्ये चित्रपट, संगीताचा आनंद मोफत घेता येणार
पुढील तीन वर्षांत भारतात “400 वंदे भारत ट्रेन” येणार