34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रDashakriya : दशक्रिया विधीचा खर्च टाळून 'लॉकडाऊन'मध्ये भरडलेल्या गोरगरीबांना केली मदत

Dashakriya : दशक्रिया विधीचा खर्च टाळून ‘लॉकडाऊन’मध्ये भरडलेल्या गोरगरीबांना केली मदत

टीम लय भारी

टाकळीहाजी : शिरुर तालुक्यातील काठापुर गावचे माजी सरपंच भाऊसाहेब औटी यांचे चुलते शंकर सखाराम औटी (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अतिशय कष्ठामधुन त्यांनी प्रगतशील शेती केली. सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या दशक्रिया विधीचा (Dashakriya) खर्च टाळुन त्या कुटुबांने शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते (Sanjay Barhate) यांच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात अडचणीत आलेल्या गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी २५ हजार रुपयांची मदत केली. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे (Popatrao Gavade) यांच्या हस्ते पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्याकडे धनादेश देण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी (आण्णा), आदर्श काठापुर गावचे माजी सरपंच भाऊसाहेब औटी, सरपंच बिपीन थिटे, बाबांचे चिरंजीव पोपट व आनंदा शंकर औटी, कांताराम दाते, उपाध्यक्ष नवनाथ रणपिसे, पत्रकार सतिष भाकरे, गोरक्षनाथ ईरोळे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी औटी कुटुंबाच्या कार्याचे कौतुक केले. त्यांचा आदर्श इतरांनी घेऊन लग्न व ईतर विधिसाठी होणारा खर्च टाळावा व कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरीब जनतेला मदत करावी असे आवाहन करताना गावडे यांनी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे कौतुक केले.

लॉकडाउनमुळे शिरुर तालुका तसेच निघोज परिसरात पत्रकार मित्रांनी संघटीतपणे गोरगरीब गरजू घटकांना किराणा किट तसेच जीवनावश्यक वस्तू देउन समाजोपयोगी काम केले आहे. शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी व त्यांच्या सर्व सहका-यांनी गेली साठ दिवसात ही मदत शेकडो कुटुंबापर्यंत कशी जाईल यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले आहेत. शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी प्रशासनातील सर्व विभागांचा समन्वय साधीत शिरुर तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची सदैव काळजी घेण्याचे काम केले आहे. तहसीलदार या महिला असूनही एवढ्या कार्यक्षमतेने काम करतात याचा शिरुर तालुक्यातील जनतेला निश्चितच अभिमान वाटावा अशी त्यांची कामगिरी आहे. आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभागानेही जनतेला चांगले सहकार्य केले आहे. जनतेने घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन गावडे यांनी केले आहे.

पत्रकार संघाने केलेली मदत लाख मोलाची

 

लॉकडाऊनच्या कालावधीत अडचणीत सापडलेल्या शेकडो कुटुंबांना शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाने केलेली मदत लाख मोलाची तसेच प्रेरणादायी असल्याचे गौरवद्गार माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले. पत्रकार संघ समाजातील विविध जातीधर्मातील गरीब घटकांना करीत असलेल्या मदतीचेही गावडे यांनी कौतुक केले. तसेच गेली दोन महिने न चूकता बारहाते यांनी वाडी वस्ती, पालावर जाऊन ज्या पध्दतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याबद्द्ल गावडे यांच्यासह उपस्थितांनी बारहाते यांचे विशेष कौतुक केले. समाजाप्रती आपलेही दायित्व आहे या भावनेतून पत्रकार संघाने कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरजूंना मदतीचा हात दिला. अशी भावना बारहाते यांनी यावेळी व्यक्त केली. बारहाते यांनी प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसिलदार लैला शेख यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना शेख यांनीही हजारो कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली, तालुका आरोग्यदायी रहावा यासाठी प्रयत्न केल्याचे यावेळी नमूद केले. औटी कुटुंबीयांनी दिलेल्या रकमेतून गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले जाणार असल्याचे बारहाते यांनी सांगितले.

माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी(आण्णा), आदर्श काठापुर गावचे माजी सरपंच भाऊसाहेब औटी, सरपंच बिपीन थिटे, बाबांचे चिरंजीव पोपट व आनंदा शंकर औटी, कांताराम दाते, उपाध्यक्ष नवनाथ रणपिसे, पत्रकार सतिष भाकरे, गोरक्षनाथ ईरोळे आदि यावेळी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी