27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजअशोक चव्हाणानंतर भाजपच्या ‘या’ नेत्यालाही कोरोनाने पछाडले!

अशोक चव्हाणानंतर भाजपच्या ‘या’ नेत्यालाही कोरोनाने पछाडले!

टीम लय भारी

नवी दिल्ली : भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी प्रवक्ते संबित पात्रा ओळखले जातात. पात्रा यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

संबित पात्रा यांची वादग्रस्त प्रवक्ते म्हणून ओळख आहे.  पात्रा हे भाजपचा राष्ट्रीय स्तरावरील चेहरा आहे. भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. बर्‍याचदा ते टीव्हीवर चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना दिसतात. त्यावेळी इतर पक्षातील प्रवक्त्यांसोबत तर कधी कधी एँकरशीही त्यांचे वाद होतात. 45 वर्षीय संबित पात्रा हे हिंदूराव रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते. ते ओएनजीसीच्या मंडळावरील संचालकांपैकी एक होते. 2012 मध्ये दिल्लीच्या काश्मिरी गेट विभागातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली होती, त्यात पात्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ राजकारणात झोकून देण्याचा निर्णय घेतला. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत पात्रा यांनी ओदिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांना 11,700 मतांनी पराभूत केले होते.

संबित पात्रा यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी