35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाड यांनी केली 'ही' मोठी घोषणा

जितेंद्र आव्हाड यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईतील टाटा कॅन्सर रूग्णालाय हे कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी प्रसिध्द रूग्णालय आहे. टाटा रूग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रूग्ण येत असतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकद्या रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले १००  प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणाच आज जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज टाटा रुग्णालयाचे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी टाटा रुग्णालयापासून ५  मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे १००  फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देत असल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले. दरम्यान, आव्हाड यांनी ही संकल्पना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर आज हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही’

कॅन्सरग्रस्तांचे नातेवाईक फूटपाथ, कोपऱ्यावर कुठेही झोपलेले असतात. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे १००  प्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या २०० होईल. प्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ७ दिवसांत झाली याचा गर्व असल्याचे यावेळी आव्हाड म्हणाले. म्हाडाने प्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटाचे असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

टाटा रुग्णालयाकडून आव्हाड आणि म्हाडाचे आभार

टाटा रुग्णालयात ३९ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील तर ६१ टक्के रुग्ण देशभरातून आलेले असतात. दरवर्षी ८०  हजार रुग्ण टाटा रुग्णालयात उपचारासाठी येतात. दररोज ३०० रुग्णांची विनंती असते की, आमची राहण्याची सोय करा. पण सर्वांची सोय करणे आम्हाला शक्य होत नाही. पण आता आम्हाला रुग्णांची मदत करता येईल. त्यामुळे म्हाडा आणि आव्हाड यांचे आभार. आम्हाला जागा मिळाल्यावर १ हजार रुग्णांची मदत आम्ही करु शकू, असे टाटा रुग्णालयाचे डेप्युटी डायरेक्टर यांनी बोलताना सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी