35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे आज मुंब्र्यात! पण अज्ञातांनी फाडले स्वागताचे बॅनर्स

उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात! पण अज्ञातांनी फाडले स्वागताचे बॅनर्स

आज शनिवारी, (11 नोव्हेंबर) शिवसेना (उबाठा) (Shivsena UBT) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसैनिकांबरोबर मुंब्रा येथे भेट देणार आहेत. मुंब्रा येथील शिवसेना शाखा बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आल्याने उद्धव ठाकरे तेथे जाऊन शिवसैनिकांना भेट देणार आहेत. मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिवसेनेच्या शिंदे (Shivsena Shinde Camp) आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. ही शाखा ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी बांधली होती. पण, ती शाखा नक्की कोणाची? या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ती पाडली. तसेच, शिंदे गटाने तेथे पुन्हा नवीन शाखा बनविण्यासाठी भूमिपूजनदेखील केले होते. आज उद्धव ठाकरे मुंब्रा येथे भेट देणार असून त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापले आहे.

मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र त्यातील अनेक बॅनर्स हे फाडण्यात आल्याचे समोर आले आहे. मुंब्रा ते ठाणे भागात रस्त्याच्या दुतर्फा बॅनरबाजी करण्यात आली होती. पक्षप्रमुख स्वतः मुंब्रा येथे येऊन वादग्रस्त शाखेला भेट देणार असल्याने ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्येही उत्साह होता. पण, बॅनर्स फाडल्याचे समोर येताच ठाणे-मुंब्रा भागातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.


याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्वीटर) ट्विट करत माहिती दिली. आपल्या ट्वीट मध्ये रस्त्यांवरील बॅनर्स फाडल्याचा व्हिडिओ पोस्ट करत आव्हाड म्हणाले, “मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी,”असे काहीही होणार नाही,आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे”,अस मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते.”


“आज दूपारी उद्धव साहेबांचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते.यातील 90% होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत.मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात.आणि “सर्वत्र नजर असणाऱ्या” पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही.आता पोलीस मला म्हणत आहेत की,”उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!” ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा 
अनुसूचित जातीचे तुकडे पाडण्यासाठी नरेंद्र मोदींची जंगी सभा !
डिलिव्हरी बॉय, मुले अन् गृहिणींचेही प्रतिज्ञापत्र, राष्ट्रवादीच्या सूनावणीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
मराठ्यांचे वाटोळे करणारे ‘ते’ कोण? २४ डिसेंबरला जरांगे-पाटील नावे जाहीर करणार

“असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि ठाणे शहर पोलिस यांचे आभार मानतो.ते “त्यांची ड्युटी” मोठ्या निष्ठेने करत आहेत.” “मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है,जो मंजुरे खुदा होता हैं..!” पोस्टच्या शेवटी ही शायरीदेखील केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी