31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंमुळे कोराना वाढला; आरोप करत केली पोलीस ठाण्यात तक्रार

राज ठाकरेंमुळे कोराना वाढला; आरोप करत केली पोलीस ठाण्यात तक्रार

टीम लय भारी

मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादच्या क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. रत्नाकर चौरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला

५ मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. राज ठाकरे यांचं  स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क लावले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि ‘मास्कवर मास्क’ असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केला.

एकूणच राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोना वाढला असे म्हणत अॅड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासन प्रशासन कोरोनाचे नियम पाळण्याविषयी जनजागृती करत आहे तसंच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यास सांगत आहे. अशा काळात एखादा जबाबदार नेता अशा प्रकारचं आवाहन करतो, तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला.

साहेब तुम्ही मोठे नेते, लोकं तुम्हाला मानतात, तुम्ही मास्क घाला

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनीही राज ठाकरे यांना याचविषयी पत्र लिहिले आहे. राजसाहेब आपण मास्क घाला, लोकं तुम्हाला मानतात, अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहिले आहे. राजसाहेब आपण जाणते नेते आहात. लोक तुम्हाला लोक मानतात, तुम्ही लोकांसाठी प्रेरणा आहेत पण असे वागू नका. कोरोना संसर्गाचा हा काळ सुरु असताना आपण मास्क परिधान करा, असे ही क्लाईड यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असे पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असे उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.

राज ठाकरेंकडून नियमांची पायमल्ली

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन सरकार करत आहे. परंतु राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसले की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी