35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रMaha Vikas Aghadi : शिवसेनेच्या महाराष्ट्र काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या सोबतीला! नाना पटोलेंसह...

Maha Vikas Aghadi : शिवसेनेच्या महाराष्ट्र काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या सोबतीला! नाना पटोलेंसह प्रमुख नेत्यांनी घेतली ठाकरे कुटुंबियांची भेट

सोमवारी (10 ऑक्टोबर) महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अंधेरी पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाचा उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकीय वादविवाद सुरू आहेत. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शिवसेना हा पक्ष आहे. अवघ्या 100 दिवसांपूर्वी सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या मदतीने महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपला सोबत घोऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या नावावरून आणि निवडणूक चिन्हावरून वादाला सुरुवात झाली. हा वाद थेट कोर्टात जाऊन पोहोचला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले.

या घटनेनंतरदेखील महाराष्ट्रात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत झालेल्या बंडाला परामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष कारणीभूत असल्याची टीका वारंवार केली आहे. अशा परिस्थितीत सोमवारी (10 ऑक्टोबर) महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अंधेरी पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाचा उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके याना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित विलासराव देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते. शिवाय शिवसेना सचिव विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, आणि अनिल परब हे शिवसेना नेते देखील देखील उपस्थित होते.

दरम्यान, सध्या शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर आता शिवसेना या नाव आणि निवडणूक चिन्हाचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. यावेळी निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या निर्देशात दोन्ही गटांना पोटनिवडणूकीसाठी प्रत्योकी 3 नावे आणि 3 चिन्हे सुचवण्याचे आदेश दिले होते. हे सर्व जमा करण्यासाठी दोन्ही गटांकडे सोमवार (10 ऑक्टोबर) पर्यंतचा अवधी होता. सध्यातरी धनुष्यबाण हे चिन्ह पोटनिवडणूकीसाठी गोठवले असल्याचे सांगण्यात येत असेल तरी या रप्रकरणाचा संपूर्ण सोक्षमोक्ष लागे पर्यंत चिन्ह आणि नाव कोणत्याही एका गटाला वापरता येणार नाही. त्यामुळे हे प्रकरण जर मुंबई आणि महाराष्चट्रातील इतर महापालिका निवडणूकांपर्यंत लांबल्यस यावेळी दोन्ही गटांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी