35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र भाजपला केंद्राकडून मिळाले ‘हे’ कानमंत्र!

महाराष्ट्र भाजपला केंद्राकडून मिळाले ‘हे’ कानमंत्र!

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपची साथ सोडल्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित रहावे लागले. महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता स्वबळावर सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपला दिल्या आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे पी नड्डा यांनी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हजर होते. भाजपाने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.“पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. याची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही असा संकल्पच केला पाहिजे.  एकटी भाजपा महाराष्ट्रात कमळ आणणार, प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागा. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल यासाठी प्रयत्न करा,” असं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी