31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांना आंबेडकरांनी दिला ‘हा’ सल्ला

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांना आंबेडकरांनी दिला ‘हा’ सल्ला

टीम लय भारी

मुंबई : सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असताना राजकारणही जोरदार सुरु आहे. महाराष्ट्र विकास आघाडी विरुद्ध भाजपा असा जोरदार सामना रंगलेला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यामध्ये उडी घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्ष विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी,” असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला घेरण्याचे काम करत आहे. आरोप प्रत्यारोप जोरदारपणे सुरु आहे. या वादामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भाजपला जोरदार टोल लगावला आहे. सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपाच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी,” असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांना दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी