30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra project : महाराष्ट्राचा दुसरा प्रकल्प गुजरातने पळवला !

Maharashtra project : महाराष्ट्राचा दुसरा प्रकल्प गुजरातने पळवला !

महाराष्ट्रातल्या प्रकल्पांची (Maharashtra project) सद्या पळवा पळवी सुरू आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत प्रकल्प हा गुजरातला नेण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

महाराष्ट्रातल्या प्रकल्पांची (Maharashtra project) सद्या पळवा पळवी सुरू आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत प्रकल्प हा गुजरातला नेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. लगेचच महाराष्ट्राचा दुसरा एक प्रकल्प गुजरातला नेल्याची माहिती येऊन धडकली. महाराष्ट्रात होणारा बल्क ड्रग पार्क आता गुजरातमध्ये होणार आहे. वेदांता- फॉक्सकॉनचा पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला आणि आता बल्क ड्रग पार्क देखील गुजरातमध्ये होणार आहे. हे सगळं कोण करतयं ? कशासाठी करतयं? असा प्रश्न सामान्य लोकांना पडल्या शिवाय राहणार नाही. परंतु ज्यांना आपल्या महाराष्ट्राची प्रगती बघवत नाही तेच हे उदयोग करत आहेत. त्यांना साथ देणारे नेते देखील आपल्याच राज्यातील आहेत.

ही गोष्ट मुळात विचार करायला लावणारी आहे. आपल्या राज्यातील अनेक नेत्यांचे भाजपबरोबर मेतकुट जमले असल्याने हा प्रकार घडतो आहे. बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प रायगडमध्ये होणार होता. हा प्रकल्प 3 हजार कोटींचा होता. या प्रकल्पामुळे 50 हजापेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळणार होता. हा प्रकल्प केवळ खोके सरकामुळे गुजरातला जात असल्याचा आरोप शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.आद‍ित्य ठाकरे म्हणतात की , महाराष्ट्राला हवे असणाऱ्या प्रकल्पांची पळवापळवी सुरू असून, नको असलेले प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे काम ही मंडळी करत आहे. बल्क ड्रग प्रकल्पामध्ये महाराष्ट्राला पावणे तीन हजार कोटींची गुंतवणूक करवी लागणार होती.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्ग लवकर मार्गस्थ होणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

India-South Africa T-20 Series : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड

Garba Song : गरब्यासाठी फाल्गुनी पाठक यांचे नवे गाणे रिलीज

या सरकाने केंद्राशी चर्चा करून हे प्रकल्प आपल्याकडे थांबवणे गरजे होते असे मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रकल्पामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होणार होती. हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार आहे हे उदयोग मंत्री यांना माहित होते. त्यांनी तो आपल्याकडे थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेला जात होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणपती दर्शन करण्यात मग्न होते. आता नवरात्रोत्सवाला सुरुवात होणा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गरबा, दांडीयाला न फ‍िरता राज्यातील अनेक प्रश्नांकडे लक्ष दयावे असा सल्ला देखील आद‍ित्य ठाकरेंनी यावेळी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी