महाराष्ट्र

मंगलप्रभात लोढा यांचा पुढाकार, महारोजगार मेळाव्यातून देणार हजारो रोजगार !

कोरोना महामारीनंतर आता राज्यात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यभरात सध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी महारोजगार मेळाव्याव्दारे बेरोजगार तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सोडविला जात आहे. मुंबईत येत्या शनिवारी (3 डिसेंबर) महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून मेळाव्यातून विविध कंपन्यांमध्ये 7 हजार तरुणांना नोकऱ्यांची संधी मिळणार आहे. हा मेळावार शनिवारी सकाळी १० वाजेपासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे होणार असून नोकरी इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.

मेळाव्यामध्ये हे उद्योग होणार सहभागी
मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्राॅनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.
हे सुद्धा वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; एमएमआर क्षेत्रात होणार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’
अदानी एनडीटीव्ही संचालक मंडळावर येणार
‘त्या’ घटनेनंतर कोरियन युट्युबर महिलेची पहिली प्रतिक्रीया…
तरुणांना अप्रेंटीसशिपची देखील संधी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत. मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

प्रदीप माळी

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

3 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

4 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

5 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

5 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

5 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

5 hours ago