31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणावरून आत्महत्येचं सत्र सुरूच

मराठा आरक्षणावरून आत्महत्येचं सत्र सुरूच

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. गेली अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने वातावरण चिघळू लागले आहे. याचा विपरीत परिणाम राज्यात जाणवू लागला आहे. सरकारने मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण न देण्याचे आधिच सांगितले होते. मात्र तरीही सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तयार झाले आहे. सरकरने कुणबी-मराठ्यांच्या जातप्रमाणपत्रांच्या नोंदी शिंदे समिती स्थापन करून मार्गी लावण्याचे काम सुरू केले आहे. तर कुणीही आत्महत्या करू नका असे देखील त्यांनी अवाहन दिले आहे. मात्र आत्महत्या करण्यापासून मराठा युवक थांबत नाहीत.

काही दिवसांआधी मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. तेव्हापासून आंदोलनास वेग आला. सरकार, विरोधी पक्षनेते, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आत्महत्या करू नका असे मराठा समाजाला अवाहन केले. मात्र मराठा समाजातील तरूण आपला संयम हरवून जीव धोक्यात टाकत आहेत. सरकार आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत असल्याचे मराठा आंदोलकांचे म्हणने आहे. यामुळे राज्यात मराठा तरूण आत्महत्या करत आहे. अशीच एक घटना पुण्यातील आळंदी येथे घडली आहे. आळंदी परिसरातील चिंबळी येथे मराठा आरक्षण मिळावे यासाठी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

हे ही वाचा

दिवाळीआधी भारताची दिवाळी; जीएसटीतून मिळाले 1.72 लाख कोटी

तृतीयपंथियांचे आरक्षण उपोषण मागे

दोन जातींचे सख्ख्ये भाऊ-बहीण

सिद्धेश सत्यवान बर्गे (वय २२) असे आत्महात्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असता पंचनामा करत असता त्यांना चिट्ठी सापडली. यातून सिद्धेश हा गॅस रिपेअरींगचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. या चिट्ठीत त्याने आरक्षण देण्यासाठी सरकारच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्याने सरकारला टार्गेट केले आहे. यावर कोणाचाही दोष नसल्याचे चिट्ठीत नमूद केले आहे.

मराठा आरक्षणावरून आत्महत्येचं सत्र सुरूच

काय लिहीले चिट्ठीत

मराठा आरक्षण मिळावे म्हणुन त्याने आपल्या दुकानात शटर बंद करून गळफास लावून आत्महात्या केली. यावेळी त्याने सुसाईड नोट लिहली आहे. त्यात, ‘कोणाच्याही त्रासाला कंटाळून मी माझा जीव देत नाही. आरक्षण देण्यासाठी सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून जीव देत आहे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ही माझी इच्छा आहे. यामुळे मी माझा जीव देत आहे. कोणीही कोणाला दोष देऊ नये. फक्त सोन्या, आप्पा, जीजी आणि आईला सांभाळा असे लिहून त्याने आपले जीवन संपवले आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी