29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच माणसांनी फोडले?

भुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच माणसांनी फोडले?

राज्यात मराठा आरक्षणावरून वाद-विवाद सुरू आहेत. मराठा आंदोलक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. ओबीसी प्रवर्गातून जातप्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे. यासाठी ओबीसी बांधव आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे मराठा आरक्षणासाठी विरोध करू लागले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे, मात्र ते ओबीसी कोट्यातून देऊ नये. यासाठी ओबीसी समाजाने मोर्चे, आंदोलनं केली. यावरून वादाची ठिणगी पेटली असून हा वाद घरदार पेटवण्यापर्यंत पोहचला आहे. यावरूनच आरक्षणाच्या मुद्याला आता वेगळे वळण प्राप्त झाले असून भुजबळांनी जरांगेंवर घर जाळल्याचा आरोप केला. यावर जरांगेंनी तिखट प्रतिक्रिया दिली.

काही दिवसांपासून ओबीसी समाज मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करत आहे. यावरून राज्यभर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रकाश सोळके यांचे घर पेटवण्यापासून ते हॉटेल पेटवण्यापर्यंत घटना घडल्या आहेत. मात्र यामागे मनोज जरांगे-पाटील असल्याचे भुजबळांचे म्हणणे आहे. यावर गुन्हे मागे घ्या कसं म्हणता? असा सवाल आता भुजबळांनी जरांगे-पाटीलांना केला आहे. यावर प्रतिसवाल करत जरांगेंनी भुजबळांचे कान टोचत म्हणाले की, भुजबळ साहेबांचे हॉटेल ज्याने फोडले ते त्यांच्याच माणसांच्या नातेवाईकांनी फोडले आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. अशी खात्रीलायक माहिती आहे.


काय म्हणाले जरांगे-पाटील ?

मी जे बोलत आहे ते खरे आहे, बीड येथून काही लोकं आली होती. त्यानी सांगितले की, हॉटेल आणि घर हे भुजबळांच्या नातेवाईकांनी फोडले आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली होती. मराठा शांततेने आंदोलन करत असून सत्ताधारी या आंदोलनाला गालबोट लावत आहेत. हा माझा दावा तंतोतंत खरा आहे. मराठा समाजातील आंदोलकांनी जाळपोळ केली नाही. त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. मराठा आंदोलक शांततेने आंदोलन करत आहेत.

हे ही वाचा 

‘महापालिका निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते…’ संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत

डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच दिशा मिळाली…असे का म्हणाले मनोज जरांगे-पाटील

जाणून बुजून षडयंत्र रचले जाते

मराठ्यांना विनंती आहे की, शांततेच्या मार्गाने एकत्र या. मराठा आरक्षणासाठी एक, दोन ओबीसींना पाहवत नाही. शांततेने आंदोलन करणाऱ्या पोरांना केसेसमध्ये अडकवले जात आहे. मराठ्यांच्या मुलांना जर आपण मदत केली नाही, तर मराठा समाजातील मुलंही मदत करणार नाहीत, आपल्याला ते कधीच माफ करणार नाहीत, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी