महाराष्ट्र

मायणी अट्रोसिटी प्रकरण : तपासी अधिकारी बदलण्यासाठी आमदार गोरे यांचा खटाटोप; महादेव भिसे यांचा आरोप

माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी येथील महादेव भिसे यांच्या जमीनीच्या कागदपत्रांची अफरातफर करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार गोरे यांच्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला असला तरी भिसे यांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात अपिल केले आहे. या प्रकरणी २९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी माणचे पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांची अन्य एका प्रकरणात निलंबण करण्याची लक्षवेधी विधानसभेत मांडली आहे. देशमुख हे सुनावणीच्यावेळी न्यायालयात हजर राहू नयेत याकरीता आमदार गोरे कटकारस्थान करत असल्याचा आरोप महादेव भिसे यांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून माझ्या केसचा निकाल लागेपर्यंत तपासी अधिकारी बदलू नयेत अशी मागणी महादेव भिसे यांनी केली आहे. (Mayani Atrocity Case: MLA Jayakumar Gore’s move to change investigating officer; Allegation of Mahadev Bhise)

महादेव भिसे म्हणाले की, माझ्या मालकीची जमीन लाटण्यासाठी, खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याबद्दल मी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. खरे तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा अजामीनपात्र असतानाही आमदार गोरेनी राजकीय, आर्थिक बळाचा वापर करून, कोर्ट बदलून सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळवला. तो जामीन रद्द व्हावा. यासाठी मी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी दि. 29 मार्च 2023 रोजी होणार आहे. त्या अट्रोसिटी प्रकरणाचे तपासी अधिकारी माणचे पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख आहेत. त्यांनी अट्रोसीटी प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास केलेला आहे.
या प्रकरणी आता २९ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी ते कोर्टात त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे. डॉ. देशमुख सुनावणी वेळी उपस्थित राहून सत्य परिस्थिती मांडू शकतात. आणि त्यामुळे गोरेंचा जामीन उच्च न्यायालयाकडून रद्दबातल ठरू शकतो. या भीतीने आमदार गोरेंची झोप उडाली आहे. म्हणूनच, तपासी अधिकारी डॉ. निलेश देशमुख सुनावणी वेळी उपस्थित राहू नयेत. यासाठी गोरेंनी कट कारस्थान केले आहे, असा आरोप महादेव भिसे यांनी केला आहे.

महादेव भिसे म्हणाले, येथील मेडिकल कॉलेजच्या एका प्रकरणाचा तपास डॉ. निलेश देशमुखांनी योग्य केला नसल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याची लक्षवेधी अधिवेशनात मांडली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर तपासी अधिकारी यांना अकार्यकारी पदावर बदली करतो. तपास होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल. असे सभागृहात सांगितले. त्यावर त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे. ॲट्रॉसिटी प्रकरणात सखोल तपास केलेले तपासी अधिकारी डॉ. निलेश देशमुख हे ॲट्रॉसिटी प्रकरणाच्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयात उपस्थित राहू नयेत. तपासी अधिकारी बदलण्यात यावा. एवढाच त्यांचा हेतू आहे. यापूर्वीही आमदार गोरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तपासी अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्याकडून सदर प्रकरणाचा तपास काढून घेतला होता.

हे सुद्धा वाचा 

अमृता फडणवीस लाच प्रकरण : अनिल जयसिंघानी याला 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

जयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

…असे होत राहिले तर हळूहळू महाराष्ट्र खिळखिळा होईल: आमदार भास्कर जाधव

याविरोधात मी उच्च न्यायालयात गेलो असता माझे म्हणणे रास्त असल्याचे जाणून उच्च न्यायालयाने संबंधित तपासी अधिकार्‍याकडे पुन्हा तपास देऊन त्यांच्या मदतीस कोरेगावचे उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे या दोन्ही अधिकार्‍याकडे सदर प्रकरणाचा तपास दिला आहे. अश्या प्रकारे आपल्या पदाचा गैरवापर करून दलित समाजातील लोकावर अन्याय होणार असेल तर आम्ही दाद कोणाकडे मागावयाची. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून माझ्या केसचा निकाल लागेपर्यंत तपासी अधिकारी बदलू नयेत अशी मागणी महादेव भिसे यांनी केली आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

40 mins ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

1 hour ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

14 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

14 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

15 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

15 hours ago