32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्राईमअमृता फडणवीस लाच प्रकरण : अनिल जयसिंघानी याला 27 मार्च पर्यंत पोलीस...

अमृता फडणवीस लाच प्रकरण : अनिल जयसिंघानी याला 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना दहा कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जयसिंघानी कुटुंबातील तीनही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अनिल जयसिंघानी याला सोमवारी (दि.20) गुजरात वरून अटक केल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आले होते. (Amruta Fadnavis bribery case: Anil Jaisinghani in police custody till March 27)

लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप करत अमृता फडणवीसांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा हिला तात्काळ अटक केली. पण अनिल जयसिंघांनी 7 वर्षांपासून फरार होता. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात आला. फरार जयसिंघानीला पकडण्यासाठी पोलिसांनी AJ ऑपरेशन राबवले. मुंबई पोलिसांकडून एकूण 5 पथके तयार करण्यात आली. अनिल जयसिंघानी वारंवार आपले लोकेशन बदलत होता. शिर्डी, नाशिक आणि मीरा रोड असा प्रवास करुन तो गुजरातला गेला. मुलगी अनिक्षाला अटक झाली. त्यावेळी 16 मार्चला तो मीरा रोडमध्ये होता. गुजरातमध्ये तब्बल 72 तास अनिल जयसिंघांनी चकवा देत होता. अखेर रविवारी रात्री बाराच्या सुमारास गोध्राला जात असताना कलोल इथून नाकाबंदी करुन त्याला अटक केली.

अनिल जयसिंगाने यांना मुंबई सत्र न्यायालयात आज हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 14 दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी केली होती मात्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी अनिल आणि। निर्मल जयसिंगानी याला 27 मार्च पर्यंत तर अनिल यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अनिल जयसिंगानी यांच्यावतीने वरिष्ठ वकील वीरेंद्र खन्ना यांनी युक्तिवाद करताना म्हटले की अनिल जयसिंगाने यांना पोलिसांकडून करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून गुजरात मध्ये अटक केल्यानंतर कुठल्याही ट्रांजिक रिमांड न घेता मुंबई पोलिसांनी त्यांना मुंबईत आणले आहे असा युक्तिवाद करत पोलीस कोठडी देण्यात येऊ नये अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जयसिंगानी कुटुंबातील तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.

हे सुद्धा वाचा
जयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

…असे होत राहिले तर हळूहळू महाराष्ट्र खिळखिळा होईल: आमदार भास्कर जाधव

पीडब्ल्यूडीने केला ‘अंगापेक्षा भोंगा मोठा,’ तब्बल ५०० कोटींचा चुराडा !

बुकी अनिल जयसिंघानी गेल्या सहा सात वर्षांपासून फरार होता. त्याच्या विरोधात सात राज्यांमध्ये 16 गुन्हे दाखल आहेत. ते प्रामुख्याने आर्थिक फसवणुकीचे आहेत. अनिल जयसिंघानि याला पोलिसांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानिया हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी मैत्री वाढवून त्यांना नंतर ब्लॅकमेल केले. 10 कोटी रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखवून अनिल जयसिंघानिया याला पोलिसांच्या कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वतः देवेंद्र फडणवीस आणि पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग पासून वाचविले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी