31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमोदीजी सत्य काय आहे? काहीतरी बोला; शिवसेनेचा सवाल

मोदीजी सत्य काय आहे? काहीतरी बोला; शिवसेनेचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : “पंतप्रधानजी, आपण शूर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल. संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य काय आहे? काहीतरी बोला” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरव्दारे केला आहे. चीनी सैन्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 पेक्षा जास्त जवान शहीद झाल्यानंतर राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Sanjay Raut insists PM Narendra Modi to speak up on India China Face off) पंतप्रधान गप्प का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

“चीनच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर कधी मिळेल? गोळीही न झाडता आपले 20 जवान शहीद होतात, आपण काय केले? चीनचे किती जवान मारले गेले? चीनने आपल्या भूमीत घुसखोरी केली आहे का? पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य काय आहे? बोला, काहीतरी बोला. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे. जय हिंद!” अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. “पंतप्रधानजी, आपण शूर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आह

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी