मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, समीर वानखेडेंवर होणार गुन्हा दाखल?

टीम लय भारी

मुंबई : आर्यन खान अटक प्रकरणी (aryan Khan arrest case) दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत घडामोडींना वेग आला आहे. पंच प्रभाकर साईलला (Prabhakar Sail ) पोलीस संरक्षण दिल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांची भेट घेतली. यावेळी, गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे(Mumbai Police Commissioner meets Home Minister )

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची  मंत्रालयात जाऊन भेट घेतली. पंच प्रभाकर साहिल प्रकरणी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर साईलने केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. त्याने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आलीये अशी विचारणा खुद्द गृहमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी NCB वर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नवाब मलिकांच्या नवीन ट्विटनं राज्यात खळबळ…

…अखेर समीर वानखेडेंची बदली होणार?

 प्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि पंच केपी गोसावी यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. प्रभाकर साईल हा स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे.  किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केली होती. त्यानंतर ही डील 18 कोटींवर झाली. यातील कोटी हे एनसीबीच्या अधिकाऱ्याला द्यायचे असं ठरलं होतं.

त्याच्या आरोपानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. तर दुसरीकडे एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी साईलचा दावा ग्राह्य धरू नये म्हणून कोर्टात धाव घेतली पण तिथेही याचिका फेटाळून लावली.

गोसावींच्या आरोपांवर पंच प्रभाकर साईलने दिले उत्तर

NCB’s Sameer Wankhede Writes To Mumbai CP, Seeks Protection Amid NCP Threats

याच दरम्यानदिलीप वळसे पाटील यांनी जर प्रभाकर साईलने गुन्हा दाखल केला तर पोलिसांना कारवाई करावी लागेलअसं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त वळसे पाटलांना भेटायला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्याविरोधात  गुन्हा दाखल होतो का हे पाहण्याचे ठरणार आहे.

Mruga Vartak

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

2 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

2 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

5 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

6 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

7 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

7 hours ago