31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई - पुणे प्रगती एक्सप्रेस सोमवारपासून ट्रॅकवर

मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस सोमवारपासून ट्रॅकवर

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई –  पुणे प्रगती एक्सप्रेस सोमवार ११ नोव्हेंबरपासून पूर्ववत सुरु होणार आहे. खंडाळा घाटक्षेत्रातील दुरुस्तीच्या कामांसाठी या गाडीची सेवा बंद करण्यात आली होती. आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खंडाळा घाटक्षेत्रामध्ये पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. मालगाडी रुळावरून घसरण्याचे घटनाही घडल्या होत्या. या दरम्यान काही दिवस पुणे – मुंबई वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घाटक्षेत्रामध्ये लोहमार्ग मजबुतीकरण आणि विविध तांत्रिक कामे हाती घेतली होती. त्यासाठी टप्प्या टप्प्याने विविध गाडय़ा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने गेल्या महिन्यांपासून प्रगती एक्स्प्रेस विविध टप्प्यात बंद ठेवण्यात आली होती.

त्याचप्रमाणे मुंबईवरून बाहेर गावी जाणाऱ्या सहा गाडय़ाही पुण्यातूनच सोडण्यात येत होत्या. अनेक लांब पल्ल्याच्या काही गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रगती एक्स्प्रेस आता ११ नोव्हेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. तसेच पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला १० नोव्हेंबपर्यंत कर्जत स्थानकावर एक मिनिटांचा थांबा देण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी