34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या सातपूरमध्ये गुढीपाडवा निमित्त बारा गाड्या ओढल्या

नाशिकच्या सातपूरमध्ये गुढीपाडवा निमित्त बारा गाड्या ओढल्या

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी माता याञेत मंगळवारी सायंकाळी अर्धनारी नटेश्वर श्री गणेशाने बारा गाड्या ओढल्या. दरवर्षी गुढीपाढव्याला ( Gudi Padwa ) सातपुर येथील भवानी मातेच्या याञेनिमित्त बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. अर्धनारी नटेश्वर वेशभुषेत श्री गणेशा कृष्णा निगळ याने गावातील वेशिवर असलेल्या मारुती मंदीर, वेताळबाबा मंदीर व औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदीरात पुजन करुन सातपूर गावातील ञ्यंबकरोडवर एकमेकाला बांधलेल्या बारा गाड्या ओढल्या. बारागाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सवाद्य मिरवणुकीत काढण्यात आली. यात्रेला प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मा. खा. हेमंत गोडसे, आ. सिमा हिरे, मा.आ. राजाभाऊ वाजे, कामगार नेते डॉ. डी. एल.कराड, माजी महापौर दशरथ पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आदीसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.(12 trains pulled on Gudi Padwa in Nashik’s Satpur)

नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरभरातून पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील विविध भागात स्वागतयात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वागतयात्रांबरोबरच शहरात हिंदू हुंकार सभा तर सातपूर परिसरात बारा गाड्या ओढण्याचा पारंपारिक कार्यक्रम देखील पार पडणार आहे. भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त सातपूरला 130 वर्षांहून अधिक काळ अखंडीतपणे गुढी पाडव्याच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो. यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक शहरातील सिडको परिसर, इंदिरानगर परिसर, सातपूर आदी भागात स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिडको परिसरात सिडको सांस्कृतिक कला मंडळातर्फे गुढी उभारण्यात येणार आहे. तर इंदिरानगर मधील सात वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वागत यात्रा निघणार आहे. सातपूर परिसरात महागुढी उभारण्यात येणार असून सायंकाळी 12 गाडी ओढण्याचा पारंपारिक उत्सव देखील साजरा करण्यात येणार आहे. तब्बल 130 वर्षांची ही परंपरा अखंडितपणे सुरु असून कोरोना काळात दोन वर्ष या उत्सवात खंड पडल्यानंतर यंदा मात्र उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, यात्रेच्या यशस्वितेसाठी समितीच्यावतीने शांताराम निगळ, गोकुळ निगळ, यात्रा उत्सव समिती अध्यक्ष गोकुळ निगळ, उपाध्यक्ष दादा निगळ, दिलीप भंदुरे, कार्याध्यक्ष सुनिल मौले, शिवाजी मटाले, तर सचिव पदी के. के. काळे आदींसह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिसांचे सुयोग्य नियोजन असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी