32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. मात्र असे असताना शहरात महापालिकेने शहरात एका खासगी संस्थेमार्फत केलेल्या सर्वेक्षणात १०७७ वाडे व जीर्ण इमारतींना वर्षानुवर्षं नोटिसा देण्याचा सोपस्कार पार पाडला जात असून यंदादेखील पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपल्याने आला पावसाळ पाठवा नोटीस अशी महापालिकेची यंत्रणा कार्य करत असल्याचे दिसते.आजही जीर्ण अवस्थेतील या इमारती दिमाखात उभ्या असून कुठल्याही क्षणी कोसळू शकतात. परंतु, महापालिकेच्या यंत्रणांना कुठलेही सोयरसुतक नाही, उलट धोकादायक इमारती वाढत असल्याचे वास्तव आहे.

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. मात्र असे असताना शहरात महापालिकेने शहरात एका खासगी संस्थेमार्फत केलेल्या सर्वेक्षणात १०७७ वाडे व जीर्ण ( dilapidated mansion)इमारतींना वर्षानुवर्षं नोटिसा देण्याचा सोपस्कार पार पाडला जात असून यंदादेखील पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपल्याने आला पावसाळ पाठवा नोटीस अशी महापालिकेची यंत्रणा कार्य करत असल्याचे दिसते.आजही जीर्ण अवस्थेतील या इमारती( dilapidated mansion) दिमाखात उभ्या असून कुठल्याही क्षणी कोसळू शकतात. परंतु, महापालिकेच्या यंत्रणांना कुठलेही सोयरसुतक नाही, उलट धोकादायक इमारती वाढत असल्याचे वास्तव आहे.(BMC indifferent to dilapidated mansion in the city; Citizens at risk)

नाशिक मनपा (NMC) हद्दीत ३१ गावठाणे असून या गावठाणामध्ये जुन्या इमारती व वाड्यांची ( dilapidated mansion) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी चाळीस वर्षांपेक्षा अधिक आयुष्य असणाऱ्या इमारतींची संख्या वाढलेली दिसत आहे. गावठाणातील वाडे व इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहे. तर अनेक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून वापरण्यायोग्य प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वापरात येणे शक्य आहे.

गावठाणामध्ये प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या दुर्घटना घडतात. यातून कमी जास्त प्रमाणात वित्त व जीवित हानी होते. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून धोकादायक वाडे व इमारतींना नोटिसा पाठवल्या जातात. मात्र एकदा पावसाळा झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे- थे होते.असा सोपसाकार वर्षानुवर्षे सुरु आहे. मात्र यातून कोणताही नागरिकांचा प्रश्न मार्गी लागत नाही.

महापालिकेकडून तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती व वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या व धोकादायक इमारती व वाड्यांमधील ( dilapidated mansion) नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देखील दरवर्षी दिल्या जातात . त्या[प्रमाणे २०२३ च्या पावसाळ्यात धोकादायक मालमत्ता संदर्भात १०७७ वाडे व इमारतींची संयुक्त पाहणी करण्याच्या सूचना तत्कालीन मनपा आयुक्तांनी दिल्या होत्या. तसेच विभागातील अधिकाऱ्यांसह विभागीय अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारती व वाड्यांमधील घरमालक व भाडेकरूंशी चर्चा करून धोकादायक इमारती उतरून घेण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या मात्र तब्बल एक वर्षानंतर यावर कोणतेही कार्यवाही झालेली नाही.

शहर अभियंता नॉट रिचेबल
शहरात किती इमारती वाडे ( dilapidated mansion) सद्यस्थितीत धोकादायक आहेत . त्याच्यावर मनपाने नेमकी काय कारवाई केली . त्यांना यंदा पावसाळ्यापूर्वी नोटीसा देण्यात आल्या कि नाही याबाबत शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असला तरीही …
शहरातील वाद्यांच्या धोकादायक भाग कोसळून हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मागील वर्षी पावसाळ्यात देण्यात आल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांना इमारतीचा  धोकादायक भाग व जीर्ण झालेल्या इमारती व वाडे निदर्शनास येऊनही धोकादायक उतरविण्याची तसदी घेतली गेली नाही.त्यामुळे अधिकारी आपल्या कर्त्यव्य बाबत किती उदासीन आहेत हे यातून दिसून आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी