33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात साजरा झाला. . भगवान विष्णूंसह पितरांच्या पूजनासाठी या तिथीला विशेष महत्त्व असल्याने या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत करा-केळी (मातीची मडकी)पासून सोन्यापर्यंतच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. गुढीपाडव्याला सोन्याचे दर ७५२०० रुपये प्रतितोळा होता तर हाच दार अक्षय तृतीयेला ७२५०० पर्यंत घसरल्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेडी करण्यात आली. या दिवशी केले जाणारे कर्म अक्षय्य राहते या भावनेतून अनेकानी सोन्यासह विविध संसारोपयोगी वस्तूंच्या खरेदीवरही भर दिला.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात साजरा झाला. भगवान विष्णूंसह पितरांच्या पूजनासाठी या तिथीला विशेष महत्त्व असल्याने या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत करा-केळी (मातीची मडकी)पासून सोन्यापर्यंतच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. गुढीपाडव्याला सोन्याचे दर ७५२०० रुपये प्रतितोळा होता तर हाच दार अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya )७२५०० पर्यंत घसरल्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेडी करण्यात आली. या दिवशी केले जाणारे कर्म अक्षय्य राहते या भावनेतून अनेकानी सोन्यासह विविध संसारोपयोगी वस्तूंच्या खरेदीवरही भर दिला.(Crores of rupees in the market on the occasion of Akshaya Tritiya )

सोने खरेदी, वास्तू प्रवेश, विवाह आदी शुभ कार्यांसाठी हा योग महत्त्वाचा मानला जात असल्याने आज अनेक ठिकाणी वास्तुप्रवेश झाले.तर अनेकांनी नवीन प्रॉपर्टी खरेदी करीत मुहूर्त साधला. दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या खरेदीसाठी देखील मोठी गर्दी दिसून येत होती. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षयतृतीया (Akshaya Tritiya ) हा भारतीय संस्कृतीत महत्वाचा सण मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवशी असल्याने शेतकरीवर्ग नवीन अवजारे खरेदी केली . तसेच यादिवशी नवीन कपडे , सोनेखरेदीची प्रथा पालण्यात आली. पूर्वजांच्या स्मरणासाठी कराकेळी पूजन अनेक घरात करण्यात आले . अक्षय तृतीया हा सण खानदेशात तसेच बागलाण , कळवण , सटाणा ,मालेगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. बाजारपेठेत गृहपयोगी वस्तू , इलेक्ट्रॉनिक वस्तू , मोबाइल खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती.

गुढीपाडव्याला २४ कॅरेट सॊने ७५२०० प्रतितोळा रुपये दर होता मात्र अक्षय तृतीयेला हाच दर ७२५०० पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी मागणी होती. वेढे, दागिने, नेकलेस आदी वस्तुंना मोठी मागणी होती. यानिमित्ताने बाजारात कोट्यवनधीची उलाढाल झाली.
किरण सोनार . वडगावकर ज्वेलर्स नाशिकरोड

लग्नसराई साठी पाच मे नंतर अस्त असला तरी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने गुंतवणूक तसेच दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. २९ जूनला पुन्हा लग्न सुरु होतील मात्र आज अक्षय तृतीयेच्या निमितणे सोने बाजारात कोट्यवनधीची उलाढाल झाली.
राजेंद्र ओढेकर , सराफ , नाशिक

महागड्या दरानेच झाली आंबा खरेदी
दरवर्षी आंबा बाजारात येताच तरुण मंडळी खाण्यास सुरुवात करतात. मात्र अजूनही अनेक ज्येष्ठ मंडळी अक्षय्य तृतीयेपासूनच आंबा खाण्यास सुरुवात करते. आंबा बाधू नये, आणि अक्षय्यतृतीयेपर्यंत आंबा पिकतो, हे त्यामागील प्रमुख कारण आहे. नाशिकच्या बाजारपेठेत कोकणातून रत्नागिरी, पनवेल, देवगड, सिंधुदुर्ग येथून हापूस आंबा दाखल होतो. हापूसच्या आकारानुसार पेटीचा भाव ठरतो. हापूसचा महागडा आवाका लक्षात घेता खवय्यांकडून केशर, लालबाग किंवा अन्य आंब्यांची निवड केली जाते. यंदाही नाशिकच्या बाजारपेठेत कोकणचा आंबा दाखल झाला असून अडीच ते तीन हजार पेटी दराने आंब्याची विक्री झाली. दरवर्षी आंबा दर अक्षय तृतीयेनिम्मतीने कमी होत असले तरी यंदा मात्र शहर आणि जिल्हात महाग दराने आंबा खावा लागला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी