31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या कोअर समितीचे सदस्य डी.जी.सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी सूर्यवंशी यांना या बाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार आणि प्रसाराची धुरा सांभाळणे तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने असलेले सर्व निर्णय प्रक्रिया राबविण्याची महत्वाची जबाबदारी मिळाल्याने हा एक प्रकारे सूर्यवंशी यांच्या आतापर्यंतच्या कार्याची खरी पावतीच म्हणावी लागेल.

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या कोअर समितीचे सदस्य डी.जी.सूर्यवंशी (D.G. Suryavanshi) यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी सूर्यवंशी यांना या बाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचार आणि प्रसाराची धुरा सांभाळणे तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने असलेले सर्व निर्णय प्रक्रिया राबविण्याची महत्वाची जबाबदारी मिळाल्याने हा एक प्रकारे सूर्यवंशी यांच्या आतापर्यंतच्या कार्याची खरी पावतीच म्हणावी लागेल.(D.G. Suryavanshi coordinator for Rajabhau Waze’s campaign)

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर समन्वय साधण्याची जबाबदारीही सूर्यवंशी यांना पार पाडावी लागणार आहे.माझ्यावरटाकण्यात आलेली जबाबदारी खूप मोठे आहे याची मला जाणीव असून सर्व घटक पक्षांशी चांगला समन्वय ठेवून राजाभाऊ वाजे यांना विजय करण्यासाठी आपण आपल्या सर्व कसब पणास लावू,असे सूर्यवंशी यांनी नियुक्तीनंतर बोलताना सांगितले.एकीकडे महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांची नाशिकमध्ये प्रचाराची सभादेखील पूर्ण झाली आहे. राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे दोन्ही उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. या वेळी माजी महापौर विनायक पांडे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,महानगर संघटक सचिन बांडे,संतोष गायकवाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी रुषी वर्मा,संजय परदेशी,सुनील जाधव,करण लोणारी,राजेश चाटोरीकर,ईमरान तांबोळी,मंदार बर्वे,आतिष जाधव,निलोफर शेख आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी