31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओनरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांची ‘लय भारी’चे संस्थापक संपादक तुषार खरात यांनी मुलाखत घेतली. नरेंद्र मोदींचे कार्य व कर्तृत्व कसे आहे, हे सांगताना ज्ञानेश महाराव यांनी कठोर मूल्यमापन केले(How Narendra Modi Not resembles Indira Gandhi). पंडित जवाहरलाल नेहरू(Pandit Jawaharlal Neharu), इंदिरा गांधी(Indira Gandhi), व्ही. पी. सिंग, राजीव गांधी(Rajiv Gandhi), अटबिहारी वाजपेयी व मनमोहन सिंग यांच्याही कामगिरीचा महाराव यांनी आढावा घेतला. नरेंद्र मोदी यांची कुठल्याच पंतप्रधानांसोबत तुलना होवू शकत नाही. हे फेकाडे पंतप्रधान आहेत. भटजीने भ्रमित करायचे, आणि शेटजीने खिसे कापायचे हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सध्याचा निवडणुकीचा प्रचार म्हणजे मतदारांना भ्रमित करण्याचाच कार्यक्रम आहे. भ्रमित करून निवडणुकीत यश मिळाले की, त्यानंतर अंबानी, अदानी यांच्यामार्फत मतदारांचे खिसे कापायचे असा त्यांचा कार्यक्रम असतो. दुर्दैवाने ८० टक्के लोकांना लोकशाहीच समजलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr.Babasaheb Ambedakar) म्हणाले होते की, शिक्षीत लोकं ही अधिक धोकादायक असतात. तेच दिसून येतंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी