33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउन्हाचा तडाखा वाढला मात्र शहरात स्वाईन फ्लू नियंत्रणात

उन्हाचा तडाखा वाढला मात्र शहरात स्वाईन फ्लू नियंत्रणात

एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा मोठा होता त्यात शेवटच्या आठवड्यात पारा ४३ अंशावर पोहचल्याने शहर आणि जिल्हयात स्वाईन फ्लू रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यात सिन्नर आणि मालेगाव येथील दोन महिलांचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आणि जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आली होती. मात्र मे महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा, लग्नसराई आणि प्रचाराची गर्दी कायम असली तरी स्वाईन फ्लू नियंत्रणात असल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. स्वाईन फ्लूने आपले पाय पसरु नये म्हणून जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या होत्या.

एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा (Heat wave intensifies) मोठा होता त्यात शेवटच्या आठवड्यात पारा ४३ अंशावर पोहचल्याने शहर आणि जिल्हयात स्वाईन फ्लू (swine flu) रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यात सिन्नर आणि मालेगाव येथील दोन महिलांचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आणि जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आली होती. मात्र मे महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा, लग्नसराई आणि प्रचाराची गर्दी कायम असली तरी स्वाईन फ्लू (swine flu) नियंत्रणात असल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. स्वाईन फ्लूने आपले पाय पसरु नये म्हणून जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या होत्या.(Heat wave intensifies, but swine flu under control in city)

उन्हाचा तडाखा वाढत असताना स्वाईन फ्लूचा धोकाही वाढला होता. त्यातच एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र विषाणूजन्य तापाची साथ सुरु असताना स्वाईन फ्लूने भर घातल्याने आरोग्य यंत्रनेचि डोकेदुखी वाढली होती. असे असले तरी सद्यस्थितीत वाढत्या गर्दीमुळे आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सध्या लग्नसराईचा हंगाम जोरदार सुरु आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी गर्दी दिसून येते तर दुसऱ्या बाजूला लोकसभेचा प्रचार शिगेला पोहचला असून उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणांत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे देखील आरोग्य यंत्रणा सतर्क होत्या. मात्र सध्या कोणत्याही रुग्णाचे अहवाल पॉसिटीव्ह आले नाहीत त्यामुळे स्वनाईन फ्लू चा धोका कमी झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ठ केले आहे.

कशामुळे होतो स्वाईन फ्लू ?
स्वाईन फ्लू, ज्या रोगाला स्वाईन इन्फ्लूएन्झा असेही म्हटले जाते. यामध्ये सर्वात आधी डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

उन्हाचा तडाखा आणि तापमान वाढत असताना स्वाईन फ्लू चा प्रादुर्भाव वाढतो. मागील महिन्यात जिल्हयातील दोन महिलांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेने अनेक प्रभावी उपाययोजना राबवल्या. परिणामी सध्या स्वाईन फ्लू नियंत्रणात असून सध्या कोणत्याही रुग्णाचे अहवाल पॉसिटीव्ह नाहीत .
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी