31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररमजानसाठी शिरखुर्म्याच्या गोडव्याला महागाईचा तडका

रमजानसाठी शिरखुर्म्याच्या गोडव्याला महागाईचा तडका

रमजान ईद(Ramjan Eid) आज साजरी होणार असून, त्यापूर्वीच दुधाचे भाव गगनाला (Inflation) भिडले आहेत. सणासुदीच्या काळात गायीचे दूध पाच रुपये तर म्हशीचे दूध २५ रुपयांनी वधारले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात गायीच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीच्या दुधाला शभर रुपयांपर्यंत दर मोजावे लागत आहेत. सणासुदीच्या काळात इतर वस्तूंचे दर वाढत असतानाच आता नाशिककरांना दूध दरवाढीचाही सामना करावा लागत आहे. दूध बाजारात महाशिवरात्रीपासून दुधाच्या दरांत प्रतिलिटर दहा रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.(Inflation hits the sweetness of the head)

मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचे दूधही काही प्रमाणात आटले आहे. त्यामुळे दूध बाजारात दुधाची आवक कमी झाली असून, व्यावसायिकांनी दर वाढविले आहेत. शहरातील दूध बाजारात महाशिवरात्रीपासून दरांत वाढ नोंदविली गेली. त्यानंतर होळी आणि गुढीपाडव्यासह, रमजान ईदमुळे दरांत सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे.
दुधाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून, ऐन सणासुदीच्या तोंडावर दुधाचे दर वाढल्याने उत्सव साजरे करताना सर्वसामान्यांना महागाईच्या झळाही सोसाव्या लागत आहेत. दूध बाजारात गायीचे दूध ४५ रुपये प्रतिलिटरवरून ५० रुपयांवर तर म्हशीचे दूध ७० ते ७५ रुपयांवरून १०० रुपये झाल्याची माहिती दूध विक्रेत्यांनी दिली. उन्हाचा चटका जाणवू लागल्याने जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी दुधाची आवकही कमी झाली आहे. गुढीपाडवा, बोहरी समाज बांधवांची ईद, रमजान ईद यानिमित्त मागणी वाढल्यानेही दुधाचे भाव वाढले आहेत.- हाजी तौफिक शेख, दूध विक्रेता

दूध खरेदीसाठी रांगा
रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बुधवारी शहरातील जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव भागात दूध खरेदीसाठी दूध विक्रीच्या दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे दुधाचा पुरवठाही कमी पडला. सर्वांना दूध मिळावे, यासाठी काही दूध विक्रेत्यांनी प्रति व्यक्ती १ लिटर इतकीच दूध विक्रीसुद्धा केल्याचे चित्र वडाळागावात पाहावयास मिळाले.

शिरखुर्म्याच्या गोडव्याला महागाईचा तडका
तीव्र उन्हाळा, चाराटंचाई आणि दुधाला वाढलेली मागणी यामुळे पुरवठा कमी पडू लागला आहे. मागणीच्या तुलनेत दुधाचा पुरवठा अपुरा पडत असल्याने दूध बाजारात दर गडगडले. सणासुदीचा काळात दुधाची मागणी दुप्पट झाली. तसेच, यंदा खोबरे वगळता सर्व प्रकारच्या सुकामेव्याचे दर भडकले आहेत. चारोळी, किसमिस, पिस्ता, काजू, बदाम हा सर्व सुकामेवा महागला आहे. यामुळे यंदा ईदच्या शिरखुर्म्याच्या गोडव्याला महागाईचा तडका मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीही व्यक्त केली जात आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी