31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये शारदा मोटर्स कंपनीच्या परिसरात पुरुषाचा मृतदेह आढळला

नाशिकमध्ये शारदा मोटर्स कंपनीच्या परिसरात पुरुषाचा मृतदेह आढळला

नाशिक शहरातील सातपूर या ठिकाणी अनेक दिवसांपासून खुनाच्या घटनांचं सत्र सुरू आहे. आज देखील सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर शारदा मोटर्स कंपनीच्या (Sharda Motors company) परिसरात एका पुरुषाचा मृतदेह(Mans body) आढळल्याने शहरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सातपूर येथील नाल्याच्या परिसरात एक पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे.
प्राथमिक माहितीच्या आधारे हा व्यक्ती नाल्याच्या परिसरात गुरे चरवण्यासाठी गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने सातपूर पोलीस पुढील तपास करत आहे.(Man’s body found in Sharda Motors company premises in Nashik )

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील सातपूर येथे शारदा मोटर्स कंपनीच्या परिसरात एका पुरुष जातीचा मृतदेह आढळला आहे. स्थानिक नागरिकांनी हा मृतदेह आढळल्यानंतर सातपूर पोलिसांना संबंधित माहिती कळवली. त्यानंतर सातपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सातपूरच्या शारदा मोटर कंपनी परिसरातील नाल्याच्या आवारात हा मृतदेह आढळला आहे. पुरुष जातीचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती जनावरे चरवण्यासाठी त्या परिसरात गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र हा मृतदेह कोणाचा आहे या संदर्भात सातपूर पोलीस अधिक माहिती घेत आहे. हा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात सातपूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मृतदेह नाशिकच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली नसून या संदर्भात सातपूर पोलिसांचा तपास सुरू आहे. नाशिक शहरात मागील अनेक दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे.

प्राणघातक हल्ले, खून यांसारख्या घटना सातपूर अंबड परिसरात वारंवार घडत आहे. आज देखील सातपूर येथे एकाचा मृतदेह आढळल्यामुळे हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा व्यक्ती त्या परिसरात जनावरे चारण्यासाठी गेला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र हा व्यक्ती नेमका कोण होता याची खातरजमा करण्यासाठी सातपूर पोलीस प्रयत्न करत आहे. नाशिक शहरात वारंवार घडत असलेल्या गंभीर घटनांमुळे नाशिककरांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक शहर पोलीस नेमके काय करताय असा सवाल आता सर्वसामान्य नाशिककर विचारू लागले आहेत. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी नाशिक शहर पोलीस काय उपायोजना करणार याकडे सर्वांशी लक्ष लागून राहिले आहे.नाशिक शहर पोलीस काय उपायोजना करणार याकडे सर्वांशी लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी