31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांचे आज अर्ज

नाशिक महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांचे आज अर्ज

लोकसभा निवडणूक रणधुमाळीत नाशिक व दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सोमवारी (ता. २९) आपले अर्ज सादर करणार आहेत. नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील.शुक्रवार (ता. ३)पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

लोकसभा निवडणूक रणधुमाळीत नाशिक व दिंडोरीचे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार  सोमवारी (ता. २९) आपले अर्ज सादर करणार आहेत. नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze)  यांच्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे ( Bhaskar Bhagre) यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील.शुक्रवार (ता. ३)पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.(Nashik Maha Vikas Aghadi candidates Rajabhau Waze, Bhaskar Bhagre file nominations today)

महाविकास आघाडीने सोमवारचा मुहूर्त निश्‍चित केला असून, जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी उमेदवारांनी ठेवली. दिंडोरीपेक्षा नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच होणार असल्याने याठिकाणी शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद दाखवून देण्याची संधी उमेदवारांना मिळाली आहे. शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत शुक्रवार (ता. २६)पासून उमेदवारी अर्ज सादर करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी शांतीगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला. दिंडोरीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित, सुभाष चौधरी यांनी अर्ज सादर केला.

महायुतीला नाशिकमध्ये उमेदवार मिळालेला नाही. येत्या आठवड्यात या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार असून, नाशिकची लढतही स्पष्ट होईल. महायुतीतर्फे गुरुवारी (ता. २) अर्ज सादर करण्याचे नियोजन सुरू आहे. महायुतीत चर्चा उमेदवारीचीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते या शक्तिप्रदर्शनात सहभागी होतील. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी चारच दिवस शिल्लक असल्याने इच्छुकांना कागदपत्रांची पूर्तता करताना कारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निश्‍चित होऊन अर्जही सादर होण्याची वेळ आली.उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी चारच दिवस शिल्लक असल्याने इच्छुकांना कागदपत्रांची पूर्तता करताना कारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निश्‍चित होऊन अर्जही सादर होण्याची वेळ आली.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल, याविषयी नाशिककरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना उमेदवार का घोषित केला जात नाही, याचे नागरिकांना आश्‍चर्य वाटते. ऐनवेळी होणारी बंडखोरी टाळण्यासाठी इतका उशीर केला जात असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे महायुतीच्या शक्तिप्रदर्शनापेक्षा उमेदवाराची चर्चा अधिक रंगताना दिसते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी