33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिककरांना पुन्हा होणार मॉडेल रोडचा त्रास

नाशिककरांना पुन्हा होणार मॉडेल रोडचा त्रास

महापालिकेतर्फे मॉडेल रोड ( Model road ) साठी अधिसूचना जारी करत रस्ता कामासाठी पोलीस अधीक्षक बंगल्यापासून तर शरणपूर रोड सिग्नलपर्यंत रस्ता नुकताच बंद करण्यात आला शुक्रवारी या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु असली तरी तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने यापूर्वी अशोक स्तंभ त्र्यंबकनाका या दरम्यान उभारलेल्या स्मार्ट रोडच्या कामाचा अनुभव नागरिकांना येणार असून आगामी काळात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चिन्ह आहे. अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका हा स्मार्ट रस्ता उभारण्यात आला खरा मात्र त्यात सध्या कोणताही स्मार्टपणा उरलेला दिसत नाही.(Nashik residents to suffer from model road again)

महापालिकेकडून येथील चारही बाजूस असलेले अतिक्रमण हटवावे. पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांसह दुचाकी चालकांसाठी मोकळा करून दिल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आल्या. तसेच इतर भागातीलही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी नागरिक करत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहतूक नियोजनातील समस्या मात्र कायम आहे. वाहतूक कोंडीत यामुळे भरत पडत आहे. प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. तेथील फूटपाथ सर्रास पार्किंगसाठी वापरले जात आहेत तर तेथील गतिरोधाक देखील अपघांताना आमंत्रण ठरत आहेत. त्यामुळे सिबिएस ते शरणपूर रोड हा मॉडेल रस्ता उभारताना त्याची पुनरावृत्ती व्हायला नको, अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत. महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात या रस्त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, दोन कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च केले जाणार आहेत. शुक्रवारी या रस्ता खोदकामाला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी पोलीस अधीक्षक बंगल्यापासून तर शरणपूर रोड सिग्नलपर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली. दुपारी उन्हामुळे वाहनांची वर्दळ कमी होणार असली तरी सकाळी आणि सायंकाळी येथे पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

नाशिक सिटीझन फोरमचे निवेदन
गुरुवारी नवीन पंडित कॉलनी भागातील काही व्यापार्यानि मनपाने लावलेले बॅरिकेट्स काढत रस्ते मोकळे केले. त्यामुले काहि काळ तणावाचे वातावरण निर्मण झाले होते.काहि काळ तणावाचे वातावरण निर्मण झाले होते. शुक्रवारी काही व्यापारी मनपा आयुक्तनाची भेट घेणार होते मात्र नाशिक सिटीझन फोरमच्या शिष्टमंडलनने मनपा आयुकान्ताची भेट घेत व्यापारीवर्गाला वारंवार होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी