सध्या भारतात IPL 2024 ची धुमाकूळ सुरु आहे. भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा देखील यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहे. यंदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याला दिली आहे. (IPL 2024 rohit sharma retirement hints) त्यामुळे रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. यानंतर चाहत्यांना रोहित शर्मा 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (IPL 2024 rohit sharma retirement hints)
विराट कोहलीच्या विनंतीने बदलले वानखेडे स्टेडियमचे वातावरण, चाहत्यांनी केला हार्दिकच्या नावाचा जल्लोष
Rohit Sharma said, “MCG is the most intimidating Stadium to play. We played a Boxing Day Test match there, it was an amazing atmosphere like if you’re on the right side of it you can have fun, but if you’re not then they’re going to make your life tough”. (BWC/Gaurav Kapur). pic.twitter.com/zCHXVSTcGt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 12, 2024
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी आश्चर्यकारक होती, परंतु स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाने हरवले. यानंतर रोहित आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असे वाटत होते. मात्र, आता स्वत: रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीबद्दल खुलासा केला आहे. रोहितने सांगितले की तो किती दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. (IPL 2024 rohit sharma retirement hints)
IPL 2024: T20 विश्वचषकात मिळणार दिनेश कार्तिकला संधी? रोहित शर्माने सामन्यादरम्यान म्हटलं असं काही…
प्रसिद्ध होस्ट आणि अँकर गौरव कपूर यांच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या शोमध्ये रोहित शर्माने निवृत्तीबद्दल मोकळेपणाने बोलले आणि तो किती काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे हे सांगितले. रोहित म्हणाला की, मी या सर्व गोष्टींचा विचार करत नाही. सध्या मी चांगला खेळत आहे आणि आणखी काही वर्षे खेळत राहीन. मला विश्वचषक जिंकायचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 2025 मध्ये खेळवला जाणार आहे आणि मला आशा आहे की टीम इंडिया जिंकण्यात यशस्वी होईल. (IPL 2024 rohit sharma retirement hints)
T20 World Cup 2024 मध्ये रोहित शर्मासोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग, ब्रायन लाराने दिला सल्ला
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दोन मोठ्या आयसीसी टूर्नामेंटच्या फायनल गमावल्या आहेत आणि दोन्ही वेळा टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताला प्रथम जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आणि नंतर एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. आता टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणखी एक मोठी ICC टूर्नामेंट T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज आहे. (IPL 2024 rohit sharma retirement hints)