31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या डेरेडार झाडांची छाटणी केवळ जाहिरातीचे होल्डिंग दिसावे याकरता करण्यात आली. यावेळी सबंधिताना उपस्थित नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष तथा विभागीय अधिकारी पश्चिम विभाग यांचे पत्र दाखवले. तर मनपाची परवानगी असेल तरी झाडे तोडताना प्रथम पंधरा दिवस अगोदर नोटीस झाडाला चिटकवणे आवश्यक होते, ती नोटीस चिटकवली नाही. तसेच पिंपळ व चिंच ही झाडे तोडण्यास पूर्णपणे बंदी असताना ही झाडे का तोडण्यात आली असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या डेरेडार झाडांची छाटणी ( trees) केवळ जाहिरातीचे होल्डिंग (advertising billboards) दिसावे याकरता करण्यात आली. यावेळी सबंधिताना उपस्थित नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष तथा विभागीय अधिकारी पश्चिम विभाग यांचे पत्र दाखवले. तर मनपाची परवानगी सेल तरी झाडे तोडताना प्रथम पंधरा दिवस अगोदर नोटीस झाडाला चिटकवणे आवश्यक होते, ती नोटीस चिटकवली नाही. तसेच पिंपळ व चिंच ही झाडे तोडण्यास पूर्णपणे बंदी असताना ही झाडे का तोडण्यात आली असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.(Pruning rare trees for advertising billboards; Environmental activists )

झाडांवर अनेक ठिकाणी काही विक्रेते विविध माध्यमातून जाहिराती करीत आहेत तर गंगापूर रोड सह शहरात अनेक भागात चक्क झाडांना खिळे ठोकून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील अनेक नामांकित हॉटेल्स, माल्स , दुकाने यांचा समावेश आहे मात्र त्याकडे मनपाचा उद्यान विभाग का कानाडोळा करतो कि त्यामध्ये काही अर्थपूर्ण संबंध आहेत अशी चर्चा रंगत आहे.

पिंपळ, चिंच अशी दुर्मिळ झाडे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सावली देत होती. केवळ जाहिरात होर्डिंग दिसावे यासाठी मनपाने येथील झाडाच्या फांद्या छाटल्या आहेत. नाशिकचे तापमान ४१, ४२ चा पारा पार करत असताना मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने जाहिरात ठेकेदारांच्या प्रेमापोटी झाडाची कत्तल करणे हि गंभीर बाब आहे. याविरोधात आम्ही मनपा आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत.मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने जाहिरात ठेकेदारांच्या प्रेमापोटी झाडाची कत्तल करणे हि गंभीर बाब आहे. याविरोधात आम्ही मनपा आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत.
दिलीप वारे, नागरिक, नाशिक

मनपा अधिकारी हे एसी कंपनीच्या नफ्यात भागधारक असावेत. तापमानाचा पारा इतका वाढला आहे कि लोक झाड झाड करताय आणि दुसरीकडे नाशिक महापालिकेला होर्डिंगचा कळवळा आहे. लोकांना झाड मह्त्वाचे आहे त्यामुळे होर्डिंग काढून फेकून द्या काय फरक पडेल ? ऑक्सिजन आणि झाड यांचे महत्व लक्षात आणायचे असेल तर पुन्हा एकदा कोरोना आला पाहिजे असे वाटते कारण तो आल्याशिवाय ऑक्सिजनचे महत्व कळणार नाही . लोकांना झाड मह्त्वाचे आहे त्यामुळे होर्डिंग काढून फेकून द्या काय फरक पडेल ? ऑक्सिजन आणि झाड यांचे महत्व लक्षात आणायचे असेल तर पुन्हा एकदा कोरोना आला पाहिजे असे वाटते कारण तो आल्याशिवाय ऑक्सिजनचे महत्व कळणार नाही .महापालिकेचे अधिकारी शिकलेले आहेत मात्र ते सुशिक्षित नाहीत असे या घटनांवरून दिसून येते.
रमेश अय्यर , पर्यावरणप्रेमी, नाशिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी