31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सातपूर पोलिसांचा "युवा संवाद"

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सातपूर पोलिसांचा “युवा संवाद”

समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सातपूर पोलिसांनी युवा संवाद अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत परिसरातील विधिसंघर्ष बालकांशी संवाद साधत त्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न सातपूर पोलिसांकडून केला जात आहे.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून व सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सातपूर पोलिसांनी युवा संवाद (Yuva Sanvad) अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत परिसरातील विधिसंघर्ष बालकांशी संवाद साधत त्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न सातपूर पोलिसांकडून केला जात आहे.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून व सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू करण्यात आले आहे.(Satpur police’s ‘Satpur police’s ‘Yuva Sanvad’ to curb child crime ‘ to curb child crime )

राज्यात अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय असून, बाल गुन्हेगारी वाढीची कारणे शोधतांना त्याचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून सातपूर विभागात हे अभियान राबविण्यात येत आहे. थेट पोलिसांचा मुलांशी संवाद होत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण घटून महाविद्यालयीन विद्यार्थी या अभियानाशी जोडले जात आहेत. दरम्यान, विधी व परिविक्षा अधिकारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अ‍ॅड. ज्योती पठाडे यांच्यामार्फत गुन्हेगारिपासून मुक्त होऊन सुधारणा घडवून आणून त्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचे प्रशिक्षण कसे व कोठे मिळते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.यावेळी 15 विधिसंघर्ष बालक उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी