30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeराजकीयतुम्ही फोन घेतला नाही,माझ्या आईचा मृत्यू झाला; मिठू जाधव यांनी सुजय विखे...

तुम्ही फोन घेतला नाही,माझ्या आईचा मृत्यू झाला; मिठू जाधव यांनी सुजय विखे यांना भर सभेत सुनावले

भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची भरसभेत पंचाईत झाली. देउळगांव सिध्दी येथील सभेत स्थानिकांना बोलण्याची संधी दिल्यानंतर नागरीक मिठू जाधव यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना खडेबोल सुनावले. कोरोना काळात तुमच्या कार्यकर्त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. आणि तुम्ही फोन उचलला नाही, म्हणून माझ्या आईचा मृत्यू झाला, असे जाधव यांनी म्हटले. मिठू जाधव यांनी असे बोलताच मोठा गोंधळ उडाला. त्यांच्या हातातील माईक खेचून घेण्यात आला. यानंतर ज्यांनी-ज्यांनी या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रण केले होत ते तिथल्या तिथं डिलिट करण्यात आले.

भाजपाचे (BJP) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांची भरसभेत पंचाईत झाली. देउळगांव सिध्दी येथील सभेत स्थानिकांना बोलण्याची संधी दिल्यानंतर नागरीक मिठू जाधव यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना खडेबोल सुनावले. कोरोना काळात तुमच्या कार्यकर्त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. आणि तुम्ही फोन उचलला नाही, म्हणून माझ्या आईचा मृत्यू झाला, असे जाधव यांनी म्हटले. मिठू जाधव (Mithu Jadhav) यांनी असे बोलताच मोठा गोंधळ उडाला. त्यांच्या हातातील माईक खेचून घेण्यात आला. यानंतर ज्यांनी-ज्यांनी या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रण केले होत ते तिथल्या तिथं डिलिट करण्यात आले.(You didn’t take the phone, my mother died; Mithu Jadhav addresses Sujay Vikhe-Patil)

मात्र, तरीही हा व्हिडिओ व्हायरल झाला. आता हिच चर्चा सर्वत्र सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजपाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी देउळगांव सिध्दी येथे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले यांच्या उपस्थितीत प्रचार सभा सुरू होती. काही वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर नागरीकांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी मिठू जाधव यांनी हातात माईक घेत कैफियत मांडली. मिठू जाधव म्हणाले, माझ्या आईला कोरोनाची लागण झाली. उपचारानंतर ती बरी झाली. मात्र पुन्हा आजारी पडली. आईवर उपचार करण्यासाठी मी देउळगांव सिध्दी येथील विखे समर्थक कार्यकर्त्यांशी संपर्क केला. त्या कार्यकर्त्याने आपली फारशी ओळख नाही.

दुसऱ्या कार्यकर्त्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. मग मी दुसऱ्या कार्यकर्त्याशी संपर्क केला असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. माझा काही संबंध नाही, विळद घाटत गर्दी आहे असे म्हणत दुसऱ्या कार्यकर्त्याकडूनही मदत मिळाली नाही. ानंतर मी खासदार सुजय विखे यांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र खा. डॉ. विखे यांनीही माझ्या फोनला पतिसाद दिला नाही. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने माझ्या आईचा मृत्यू झाला, असे मिठू जाधव म्हणाले. ही कैफियत अडचणीची वाटतेय असे समजल्याने विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावर मध्ये बोलू नका मला बोलू द्या, असे जाधव म्हणाले. पण त्यांच्या हातातील माईक काढून घेण्यात आला. यानंतर या प्रसंगाचे ज्यांनी ज्यांनी व्हिडीओ चित्रण केले होते,

त्या सर्व उपस्थितांना शिवाजी कर्डीले यांच्या सुचनेनुसार छायाचित्रण डिलिट करण्यास सांगितले गेले. लोकांच्या मोबाईलमधील छायाचित्रण सक्तीने डिलीट करण्यात आले. मात्र काही हुषार कार्यकर्त्यांनी डिलीट केलेला हा व्हिडीओ रिसायकलबीन मधून पुन्हा रिस्टोअर केला आणि तो व्हिडीओ संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला. यामुळे सुजय विखे यांची ऐन निवडणुकीत मोठी पंचाईत झाली आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी