31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाच्या पत्राकडे स्मार्ट सिटीचा कानाडोळा

नाशिक मनपाच्या पत्राकडे स्मार्ट सिटीचा कानाडोळा

2016 साली नाशिक शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्याने नाशिककरांना मोठा आनंद व्यक्त केला होता, मात्र स्मार्ट सिटी < Smart city > कंपनीला पाहीजे तसा काम शहरात करता न आल्याने राजकीय नेत्यांसह नागरिकांची मोठी नाराजी आहे. त्यातच मनपाला स्मार्ट सिटीकडून 200 कोटींच्या व्याजा पोटी सुमारे 33 कोटी रुपये घेणे असून मनपाने अनेक वेळा पत्र देऊनही स्मार्ट सिटीकडून काहीच दाद मिळात नाही. नुकताच जानेवारीत देखील मनपाकडून स्मार्ट सिटी त्या पैशांबाबत स्मरणपत्र देण्यात आले, मात्र तीन महिने होत आले तरी स्मार्ट सिटीकडून पत्राचा उत्तर देखील देण्यात आलेला नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी विरुध्द मनपा असा नवा संघर्ष पहायला मिळत आहे.(Smart city turns a blind eye to Nashik Municipal Corporation’s letter )

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये केंद्रासह राज्य शासन तसेच नाशिक महापालिकेचा वाटा आहे. नाशिक महापालिकेच्या 250 कोटी पैकी 200 कोटी रुपये स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आलेले आहे. मात्र कामाची गती पाहिल्यावर निधी खर्च झालेला नसल्यामुळे यापैकी शंभर कोटी रुपये नाशिक महापालिका परत मिळावे, अशी मागणी मनपात लोकप्रतिनिधी असतांना त्यांनी केली होती. तर महासभेत देखील चर्चा झाली होती. तर रक्कम परत न मिळता त्यापोटी व्याजाची रक्कम महापालिकेला मिळणार, असे स्मार्ट सिटीने कबूल केले होते, मात्र सुमारे चार वर्ष झाले तरी अद्यापही व्याजापोटीचे सुमारे 33 कोटी रुपये महापालिकेला अदा करण्यात आलेले नाही. स्मार्ट सिटीची मुदत काही महिन्यानंतर संपत आल्यामुळे महापालिकेची चिंता वाढली असून महापालिकेच्या वित्त विभागाने स्मार्ट सिटीला पुन्हा पत्र देऊन याबाबत मागणी केली आहे.

सध्या नाशिक महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे मोठी विकास कामे हातात घेण्यात येत नाही. मात्र जी कामे सुरू आहे, त्यांना पूर्ण करण्यासाठी व्याजाची रक्कम मिळाल्यास विकास कामे आणखी गतीने होणार आहे. वेळेत रक्कम मिळाली नाही तर नाशिक महापालिकेच्या विकास कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेचे पैसे स्मार्ट सिटीकडे पडून आहे. यामुळे शहरातील विकास कामांसाठी शंभर कोटी रुपये स्मार्ट सिटीने परत महापालिकेला द्यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आली होती. तर महापौर सतीश कुलकर्णी असतांना महासभेत याबाबतचा प्रस्ताव देखील पारित करण्यात आला होता. मात्र स्मार्ट सिटीने फक्त व्याजापोटीची रक्कम देण्याचे कबूल केले होते. त्यावेळी स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव असलेले लिमये यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मध्ये झालेल्या आढावा बैठकीत नाशिक महापालिकेला व्याजापोटी सुमारे 33 कोटी रुपये देण्याचे ठरले होते. ती रक्कम 31 मार्च 22 पर्यंत महापालिकेला मिळणे अपेक्षित होते, मात्र 31 मार्च 24 येत आहे तरी नाशिक महापालिकेला स्मार्ट सिटी कंपनीकडून व्याजापोटीची रक्कम मिळालेले नाही. यामुळे नाशिक महापालिकेच्या विकास कामांना अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्मार्ट सिटी कडून दोनशे कोटी रुपयांच्या व्याजापोटीची रक्कम नाशिक महापालिकेला मिळणार आहे. याबाबत आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. पैसे लवकर मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. जानेवारीत पुन्हा तसा पत्र स्मार्ट सिटीला देण्यात आला आहे.
– दत्तात्रय पाथरुट, मुख्य वित्त अधिकारी, मनपा नाशिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी