32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

तापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहर आणि जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढन्याची चिन्हे आहेत. सध्या लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असल्याने उन्हाचा मोठा फटका बसत आहे . तर उन्हाळी सुटीमुळे त्रंबकेश्वर, सप्तशृंगगड आदी ठिकाणी भाविकांची गर्दी देखील कमी होताना दिसत आहे. त्यामुळे उन्हाचा फटका तेथील अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असल्याचे दिसते. नाशिक शहरासह जिल्ह्यात १ मे पासुन तापमानाचा पारा वाढता राहिला असून पाच मे रोजी तो 38 अंशावर होता.

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहर आणि जिल्ह्यात तापमानाचा पारा (Temperatures) वाढन्याची चिन्हे आहेत. सध्या लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असल्याने उन्हाचा मोठा फटका बसत आहे . तर उन्हाळी सुटीमुळे त्रंबकेश्वर, सप्तशृंगगड आदी ठिकाणी भाविकांची गर्दी देखील कमी होताना दिसत आहे. त्यामुळे उन्हाचा फटका तेथील अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असल्याचे दिसते. नाशिक शहरासह जिल्ह्यात १ मे पासुन तापमानाचा पारा वाढता राहिला असून पाच मे रोजी तो 38 अंशावर होता.(Temperatures will rise again: Heat wave warning)

तापमानाचा पारा सतत वाढता राहिल्याने त्याचा फटका शहरासह जिल्ह्यातील आठवडे बाजार यांना देखील बसत आहे. सात राज्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दोन दिवसांनंतर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
चौकट

असा आहे पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज
६ मे : छत्तीसगडसह चार राज्यांमध्ये उष्णतेची लाट. छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये दमट उष्णता असेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात जोरदार वारे वाहतील. * ७ मे मध्य प्रदेश आणि राजस्थानसह चार राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये दमट उन्हाळा सुरू राहील. * ८ मे : गुजरातसह पाच राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्येही उष्णतेची लाट राहील. तामिळनाडू, पुड्डुचेरी आणि केरळच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये विजेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी