31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा, २२२ खातेदारांच्या लॉकरमधून ५ कोटींचे दागिने लंपास

ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा, २२२ खातेदारांच्या लॉकरमधून ५ कोटींचे दागिने लंपास

नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील तब्बल पाच कोटींचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजली जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात ही धाडसी चोरी झाल्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीनंतर आता नाशिक शहरातील गुन्हेगारी पुन्हा वाढली असून शहर पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे दागिने चोरट्यांनी (jewellery worth Rs 5 crore stolen) लांबवल्याची घटना घडली आहे. या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजली जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात ही धाडसी चोरी झाल्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीनंतर आता नाशिक शहरातील गुन्हेगारी पुन्हा वाढली असून शहर पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.(ICICI Home Finance office raided, jewellery worth Rs 5 crore stolen from lockers of 222 account holders)

नाशिक मधील डोंगरे वस्तीगृह मैदान परिसरात आयसीआयसीआय होम फायनान्स या संस्थेचे कार्यालय असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची आणि लोकांची वर्दळ असते. आयसीआयसीआय होम फायनान्स संस्थेचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर असून कोणालाही न समजता अतिशय चतुराईने चोरट्याने हे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्याने तब्बल 222 खातेधारकांचे पाच कोटींची दागिने लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. लॉकर्स फोडून तब्बल पाच कोटींच्या दागिन्यांची चोरी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार लॉकर्सच्या चाव्या मध्ये ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय येत आहे. विशेष म्हणजे चोरटे पीपीई किट घालून आले होते. सीसीटीव्हीची नजर असताना आणि पहारेकरांचा पहारा असतानाही चोरट्यांनी चोरीचे धाडस केले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दरोडेखोरांचे चेहरे दिसत असून सरकार वाडा पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला आहे.

पुढच्या दरवाजावर सुरक्षारक्षक होते. मात्र चोर मागच्या खिडकीतून पळून गेल्याचे समोर येत आहे. सरकार वाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेचा छडा कधी लागणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे आता या चोरीतील मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी नाशिक शहर पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.सीसीटीव्ही कॅमेरा चोरीची घटना कैद झाली असून त्या आधारे पोलिस आता आपल्या तपास करत आहे. मात्र शहर पोलिसांकडून या चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास पाच कोटी रुपयांचे दागिने चोरी गेल्यामुळे आता ठेवीदारांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठेवीदारांचे दागिने पुन्हा मिळवून देण्याची देखील फायनान्स अधिकाऱ्यांकडून ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता या चोरीतील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागणार का? असे देखील प्रश्न आता ठेवीदारांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

चोरीचा सखोल तपास करण्यासाठी ICICI होम फायनान्सने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आयसीआयसीआय होम फायनान्स सध्या सुरू असलेल्या तपासात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे आणि जेन्युईन ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची खात्री बाळगेल, असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी