31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकेंद्र सरकारची कांदा निर्यातीची घोषणा म्हणजे निव्वळ..; संजय राऊतांचा नाशकातून हल्लाबोल

केंद्र सरकारची कांदा निर्यातीची घोषणा म्हणजे निव्वळ..; संजय राऊतांचा नाशकातून हल्लाबोल

सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहेत. दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार (दि.७ मे) रोजी होणार आहे. मात्र, त्यानंतर होणाऱ्या उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत

सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे (Lok sabha election 2024) वारे वाहत असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहेत. दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार (दि.७ मे) रोजी होणार आहे. मात्र, त्यानंतर होणाऱ्या उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे(Maha vikas aghadi) उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.(The central government’s announcement of onion exports is a mere…; Sanjay Raut’s attack on Nashik)

यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. मात्र, अर्ज भरण्याआधी संजय राऊतयांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधतांना भाजपवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले. त्यामुळे त्यांना याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार आहे. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी अनेकदा खोटे बोलले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले. त्यामुळे त्यांना याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार आहे. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी अनेकदा खोटे बोलले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीच्या जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. तर दुसरीकडे महायुतीला नाशिकमध्ये आमच्या उमेदवारांसमोर उमेदवारच मिळत नाही. नाशिकच्या जागेसाठी महायुतीकडून आम्हाला समोर गद्दारच हवा असून त्याला आम्ही गाडणारच, असे म्हणत राऊतांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर निशाणा साधला.पुढे बोलतांना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने जी कांदा निर्यातीची घोषणा केली आहे ती घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक, खोटारडेपणा आहे. गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहचवणे हा निर्यातबंदी उठवण्यामागील उद्देश आहे. त्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुठलाही फायदा नाही. त्यामुळे ही नुसती धूळफेक आहे”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.त्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुठलाही फायदा नाही. त्यामुळे ही नुसती धूळफेक आहे”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी