31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeव्हिडीओजेव्हा भारताचं हृदय पाकिस्तानात धडकतं .....

जेव्हा भारताचं हृदय पाकिस्तानात धडकतं …..

सध्याच्या काळात हृदयाशी संबंधित तक्रारी- आजार यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हृदय ट्रान्सप्लांटच्या अनेक स्टोरीज आपण आजवर ऐकल्या आहेत. पण आजची हि स्टोरी फार लक्ष वेधून घेणारी आहे कारण ह्रदय ज्या व्यक्तीला हवं आहे ती पाकिस्तानची रहिवासी असून हृदय ज्या व्यक्तीचं देण्यात आलंय आणि जिथे हि शस्रक्रिया पार पडली तो देश भारत आहे. त्यामुळे भारतीय हृदय पाकिस्तानात धडधडणार , असं बोलणं वावगं ठरणार नाही.

सध्याच्या काळात हृदयाशी संबंधित तक्रारी- आजार यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हृदय ट्रान्सप्लांटच्या अनेक स्टोरीज आपण आजवर ऐकल्या आहेत(An Indian heart gives 19-year-old Pakistani girl aayesh rashid). पण आजची हि स्टोरी फार लक्ष वेधून घेणारी आहे कारण ह्रदय ज्या व्यक्तीला हवं आहे ती पाकिस्तानची रहिवासी असून हृदय ज्या व्यक्तीचं देण्यात आलंय आणि जिथे हि शस्रक्रिया पार पडली तो देश भारत आहे. त्यामुळे भारतीय हृदय पाकिस्तानात धडधडणार , असं बोलणं वावगं ठरणार नाही.
पाकिस्तानातील कराची मधील सनोबर रशीद यांची मुलगी १९ वर्षीय आयशा हिचे चेन्नई मधील एमजीएम हॉस्पिटलमध्ये नुकतेच ट्रान्सप्लांन्ट करण्यात आले आहे. आयशा ७ वर्षाची असताना त्यांच्या लक्षात आले कि तिच्या हृदयाचा २५% भाग हा निकामी झालेला आहे. २०१९ साली सनोबर व आयशा चेन्नईमधील हृदयरोग विशेषतज्ञांना भेटल्या. त्याचकाळात आयशाला हृद्यविकाराचा झटका देखील आला होता. त्याचवेळेस आयशाच्या हृदयात एक कृत्रिम उपकरण बसवण्यात आले, पण कराचीला परतल्यावर २ वर्षातच इंफेक्शन होऊन आयशाच्या हृदयाच्या उजव्याभागाचे काम पूर्णपणे थांबले. तेव्हा डॉक्टरांनी त्यावर हार्ट ट्रान्सप्लांट हा एकच अखेरचा उपाय असल्याचे सांगितले.
हि सर्जरी पाकिस्तानमध्ये होणे शक्य नव्हते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती भारत किंवा कॅनडा इथे होणं शक्य होतं. बऱ्याच चौकशीनंतर भारत हा योग्य पर्याय असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सनोबर यांनी चेन्नई मधील डॉक्टरांशी सर्जरीसाठी संपर्क केलाच पण त्यासाठी पुरते पैसे नसल्याचे सांगताच डॉक्टरांनी ,” आप आ जाय, बाकी हम संभाल लेंगे”, असे म्हणत विश्वास दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी