28 C
Mumbai
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजीपीओ समोर पाणी गळती हजारो लिटर पाणी वाया

जीपीओ समोर पाणी गळती हजारो लिटर पाणी वाया

महानगरपालिकेच्या जीपीओ जल कुंभा जवळील वाल नादुरुस्त झाल्यामुळे हजारो लिटर पाणी बुधवारी रात्री रस्त्यावर वाया गेले. सुमारें दोन तास पाणी रस्त्यावर वाहत होते. जुन्या नाशकातील सादिक शाह जलकुंभ, बुधवार पेठ जलकुंभ या पाण्याच्या टाक्या येथून भरल्या जातात मात्र येथील वाल नादुरुस्त च झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले .यामुळे या टाक्या अपूर्ण भरल्याने त्या भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची निर्माण झाली. येथे मनपाचा कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थीत नसल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मनपाच्या निष्काळजीपणामुळे ऐन पाणीटंचाईमध्ये हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जाणे हे स्मार्ट सिटी असलेल्या नाशिक महानगरपालिकेला व स्मार्ट अधिकाऱ्यांना शोभेचे नाही अशी शहरवासीय चर्चा करत आहेत.

सध्या या परिसरात दररोज केवळ अर्धा तास पाणी येते त्यात याप्रकारे पाण्याचा अपव्यय होत असेल तर दुष्काळात तेरावाच महिनाअशी सद्यस्थिती दिसते. याला जबाबदार असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

सारे काही ठेकेदाराच्या भरोसे
मनपा हद्दीतील सर्व जलकुंभ हे महत्वपूर्ण असेल तरी अनेक ठिकाणी सुरक्षेचा अभाव आढलून येतो.एका बाजूला गंगापूर धरणात असणारा जलसाठा अपूर्ण असल्याने मनपा चर खोदण्याची तयारी करत आहे मात्र दुसरीकडे असे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने मोठा विरोधाभास दिसून येतो.
प्रतिक्रीया
अधिकारी जबाबदारीने केव्हा वागणार हा मोठा प्रश्न आहे. ठेकेदारांच्या आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर हे नाशिक शहर सोडले आहे का? नाशिकला कोणीच वाली नाही अधिकारी फक्त टेंडर काढण्याच मश्गूल आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी जबाबदारी काम करणे गरजेचे आहे असे वाटते.
राजेंद्र बागुल
प्रवक्ता नाशिक शहर काँग्रेस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी