32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यरंग खेळताना त्वचेला कसं जपाल; घ्या जाणून

रंग खेळताना त्वचेला कसं जपाल; घ्या जाणून

होळीचा (Holi Festival ) उत्सव जवळ आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. होळी हा रंगांचा सण (Holi Festival )अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. गेल्या काही वर्षांपासून होळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. होळी हा आपल्या देशातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. या सणाला बाजारामध्ये विविध रंगांची विक्री होत असते. यामध्ये काही रासायनिक रंग सुद्धा विक्रीसाठी असतात जे त्वचेला हानिकारक ठरु शकतात. 

होळीच्या निमित्ताने बाजारात पेस्ट, कोरडे रंग, ओले रंग असे अनेक पर्याय मिळतात. बाजारातील बहुतांश रंगांमध्ये भरपूर रसायने असतात. . हे रंग केवळ तुमच्या त्वचेलाच नाही तर शरीराच्या अनेक भागांनाही हानी पोहोचवतात. याशिवाय मेटॅलिक पेस्टचाही भरपूर वापर केला जातो. चंदेरी, सोनेरी आणि काळ्या रंगाच्या मेटॅलिक पेस्ट्स भरपूर दिसतात. त्यामुळे डोळ्यांची ॲलर्जी, प्रकरण गंभीर झाल्यास अंधत्व येण्याचा धोका असतो. तसेच त्वचेवर जळजळ होणे, त्वचेचा कॅन्सर, अनेक वेळा या रंगांचा असा प्रभाव पडतो की जिथे हे रंग लागलेले असतात तिथे त्वचेमधून पुरळ बाहेर पडतात. तर रंग खेळताना त्वचेला कसं जपाल जाणून घ्या…(Holi Festival Pre And Post Skincare Tips)

जाणून घेऊयात सेरेब्रल पाल्सी आजारासंदर्भात…

  • सनस्क्रीनचा वापर

होळी खेळण्यापूर्वी तुम्ही तेलाव्यतिरिक्त सनस्क्रीनचा वापर करु शकता. उन्हात होळी खेळण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या त्वचेवर सनस्क्रीन क्रीम लावणे महत्वाचे आहे. हे तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करते. हे आपली त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझर देखील ठेवते. त्यानंतर त्वचेवरील रंगही सहज निघतो.

  • तेल लावा

होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडताना त्वचेवर तेल लावा. तेल आपल्या त्वचेच्या आत रंग जाऊ देत नाही. असे केल्याने होळी खेळल्यानंतर रंग सहज काढता येईल. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल वापरू शकता.

  • बर्फाचा वापर करा

बर्फ आपल्या त्वचेचे छिद्र बंद करण्याचे काम करतो. त्यामुळे होळी खेळण्याआधी आपल्या चेहऱ्यावरील बर्फाने साधारण १० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा.ही ट्रिक्स तुमच्या त्वचेच्या आत रंग झिरपू देणार नाही आणि नुकसान होणार नाही.

  • संपूर्ण कपड्यांचा वापर

होळी खेळण्यासाठी संपूर्ण अंग झाकणारे कपडे घाला. जर शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकलेला असेल तर रंगांचा प्रभाव कमी होईल.

चहा, कॉफी नाही… तर सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ 3 गोष्टींचे सेवन, रोगांपासून रहा दूर

रंग खेळल्यानंतर कशी घ्याल काळजी?

  • चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी मसूर, मैदा, गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट
  • होळी खेळल्यानंतर कपड्याने रंग पुसून टाका. ओले पेंट असल्यास ते पुसण्याचा प्रयत्न करा.
  •  बनवा. 20 मिनिटे ठेवा. आता कोमट पाण्याने स्क्रब करा. रंग फिका पडल्यास पाण्याने धुवा.
  • क्लींजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करा. यानंतर खोबरेल तेलाने चेहऱ्याला मसाज करा. आता ते सौम्य फेसवॉशने धुवा.
  • रंग खेळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा आणि साबण अंगावर हलकेच चोळा. कोमट पाण्याने रंग सहज निघतो.
  • काही लोक रंग बाहेर पडत नाही तेव्हा जोमाने घासतात, ते तुमच्या त्वचेसाठी चुकीचे असू शकते. असे केल्याने तुमच्या शरीरावर डाग पडू शकतात.
  • होळीचे रंग खूप मजबूत असतात, त्यामुळे कधी कधी केस निर्जीव आणि कोरडे होतात. रंग दिल्यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा . केमिकल शाम्पूमुळे केस खराब होतात.
  • केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर जरूर लावा. केस पूर्णपणे कोरडे झाल्यावर त्यावर खोबरेल तेल लावा. यामुळे केस निरोगी आणि मुलायम राहतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी