31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने पाणी सोडले असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. जणू काही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.एप्रिलच्या सुरवातीला अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. मात्र यावर्षी पिण्याच्या पाणी टंचाईमुळे आवर्तन सोडण्यात येणार नसल्याने सांगितले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पाण्याअभावी उभी पिके करपली.

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने पाणी सोडले ( Water rotation) असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. जणू काही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.एप्रिलच्या सुरवातीला अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे आवर्तन ( Water rotation) सोडण्याची मागणी केली. मात्र यावर्षी पिण्याच्या पाणी टंचाईमुळे आवर्तन सोडण्यात येणार नसल्याने सांगितले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पाण्याअभावी उभी पिके करपली.(Water rotation after crop harvest; Farmers’ anger )

टंचाईच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांना आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागली असे असताना आता अचानक याच धरणाच्या नदीत पाणी सोडल्याने ती खळाळून वाहू लागल्याने पिके करपल्यानंतरच्या पाण्याने शेतकऱ्याचा संताप झाला आहे. खेड (ता.इगतपुरी) येथील धरणाच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या खेड. परदेशवाडी, बारशिंगवे, अधरवड तसेच अनेक वाड्यावर व त्यावरील कूपनलिका, विहिरी यांची पाणी पातळी या आवर्तनावर अवलंबून असते. शेतीसाठी, जनावरांसाठी, व पिण्यासाठी दरवर्षी तीन- चार आवर्तने सोडण्यात येतात. एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने पाणी सोडले असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. जणू काही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी निखिल शेलार यांच्याशी संपर्क केला असता `सकाळ’ शी बोलताना मी सुट्टीवर असून पाणी कोणी सोडले मला माहिती नसून वरिष्ठांना विचारून सांगतो असे त्यांनी सांगितले. “धरणाच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या विहीर, कूपनलिका कोरड्या पडल्या.शेतकऱ्यांनी महिनाभर अगोदरच जलसंपदा विभागाचा अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याची विनंती केली होती मात्र त्यांनी नकार दिला आणि आता पिके जळून गेल्यावर पाणी सोडले आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊन आता हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.”- पिडीत शेतकरी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी