31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय'खरे शिवसेना प्रमुख असाल तर...' रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रत्नागिरी येथे सभा पार पडत आहे. या जाहीर सभेत अमित शाह यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम व अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेना नेते किरण सामंत यांचीही सभेला प्रमुख उपस्थिती आहे. या सभेतून अमित शाह यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची रत्नागिरी येथे सभा पार पडत आहे. या जाहीर सभेत अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम व अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेना नेते किरण सामंत यांचीही सभेला प्रमुख उपस्थिती आहे. या सभेतून अमित शाह (Amit Shah) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) डिवचलं आहे.(“If you’re the real Shiv Sena chief…” Amit Shah challenges Uddhav Thackeray from Ratnagiri)

शहांनी ठाकरेंना डिवचलं
ते म्हणाले, “बनावट प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणात वीर सावरकरांचे नाव घेण्याचे धाडस करू शकतात का? सावरकरांचे नाव घेण्याची लाज वाटत असेल तर हे खरेच शिवसेनेचे अध्यक्ष आहे का? ते नकली शिवसेना चालवत आहेत, खरी शिवसेना एकनाथ शिंदे चालवत आहेत.

कलम 370 वरुनही निशाणा
अमित शाह म्हणाले, काश्मीरमधून कलम 370 हटवायला हवे होते की नाही? ज्या काँग्रेसच्या मांडीवर उद्धव बसले आहेत, ती काँग्रेस 70 वर्षे धारा 370 घेऊन बसली होती. मोदींनी कलम 370 हटवले. राहुल बाबा म्हणाले 370 काढू नका, मी म्हणालो का? ते म्हणाले रक्ताचे पाट वाहतील. रक्त सोडा, खडा मारायचीही हिम्मत नाही. 370 काढल्यावर रक्तपात होईल म्हणणाऱ्या राहुल गांधींना सांगतो. आज तिथं लाल चौकात कृष्ण जन्माष्टमी होतेय. उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पद हवंय की 370 हटवणारे? राहुल गांधी शरद पवारांना शरण जाणारे महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, अशी टीकाही ठाकरेंवर केली.

बाळासाहेबांचा वारसा तसा येत नाही’
“तिहेरी तलाक हटवावा की नाही? तिहेरी तलाक हटवणे योग्य आहे की नाही ते सांगावे असे आव्हान मी उद्धव यांना करतोय. पीएफआयवर बंदी घालणे योग्य आहे की नाही? मोदीजींनी ठरावात घोषणा केली आहे की ते UCC आणतील आणि मुस्लिम पर्सनल कायदा काढून टाकतील. उद्धवजी, कृपया या प्रश्नाचे उत्तर द्या, तुम्हाला 370 हटवायचे आहे का? तिहेरी तलाक हटवायचा आहे का? तुम्हाला मुस्लिम पर्सनल लॉ हटवायचा आहे का? बाळासाहेबांचा वारसा असाच मिळत नाही.”

कोरोना काळात खिचडी घोटाळा
मोदींना दुसऱ्यांदा प्रधानमंत्री केलं, त्यांनी राममंदिर बांधून दाखवलं. माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. राममंदिर झालं ते चांगलं झालं असं म्हणू शकता का? राममंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव गेले. माझं त्यांना आव्हान आहे, तिहेरी तलाक हटविला ते योग्य आहे ? पीएफआयवर बंदी घातली ते योग्य आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पाकिस्तानात घुसून हवाई स्ट्राईक केला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांबरोबर ठाकरे गेले. कोरोनाकाळात खिचडी खाण्याचं काम तुम्ही केलं असल्याचा आरोपही शहा यांनी यावेळी ठाकरेंवर केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी