31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयशवंत मंडईतील गाळे धारकांना आठवडयाचा अल्टीमेटम

यशवंत मंडईतील गाळे धारकांना आठवडयाचा अल्टीमेटम

यशवंत मंडईतील < Yashwant Mandi > गाळेधारकांना नोटीस बजावूनही त्याकडे दूर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात करसंकलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गाळेधारकांना आठवडयाचा अल्टीमेटम < Ultimatum > दिला आहे. दरम्यान 2014 पासुन या गाळेधारकांकडे एक कोटीचे भाडे थकीत आहे. पालिकेने सक्त होत गाळे सील करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यापूर्वी यशवंत मंडई ही इमारत जीर्ण झाल्याने महापालिकेने स्ट्रक्चर ऑडीट केल्यानंतर ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर पालिकेने ही इमारत जमिनदोस्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतु भाडेकरुंनी पालिके विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयात गाळेधारकांच्या विरोधात निकाल गेला.(Week’s ultimatum to street vendors at Yashwant Mandi)

पुढे महापालिका प्रशासनाने या इमारतीमधील भाडेकरांकडे असलेली एक कोटीची थकबाकेी वसुलीसाठी पावले उचलली आहेत. तसेच जो कोणी पळ्वाटा काढेल, किंवा थकबाकी भरणार नाही. तर संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवला जाणार आहे. या ईमारतीत तेवीस गाळेधारक असून दहा वर्षांपासून एक कोटी भाडे थकले आहे. भाडे न भरणाऱ्यांचे गाळे सील करणार आहे. दरम्यान रविवार कारंजा येथील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. येथे पार्किंगची जागा नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच ही इमारत पाडून तेथे बहुमजली पार्किग उभारण्याचे नियोजन आहे. व्यावसायिकांना गाळे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तत्पूर्वी थकबाकी वसुल केली जाणार आहे. गाळे धारकांनी त्यांचे भाडे न भरल्यास गाळे सील करुन त्यांच्या मालमत्तेवर थेट बोजा चढवला जाणार आहे. दरम्यान भाडेकरुंनी महापालिकेकडे थकबाकी भरण्यासाठी पालिकेकडून मुदुतवाढ देण्याची मागणी केली असता मनपाने मंगळ्वार पर्यत .मुदतवाढ दिली आहे.

दरम्यान रविवार कारंजा येथील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. येथे पार्किंगची जागा नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच ही इमारत पाडून तेथे बहुमजली पार्किग उभारण्याचे नियोजन आहे. व्यावसायिकांना गाळे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तत्पूर्वी थकबाकी वसुल केली जाणार आहे. गाळे धारकांनी त्यांचे भाडे न भरल्यास गाळे सील करुन त्यांच्या मालमत्तेवर थेट बोजा चढवला जाणार आहे. दरम्यान भाडेकरुंनी महापालिकेकडे थकबाकी भरण्यासाठी पालिकेकडून मुदुतवाढ देण्याची मागणी केली असता मनपाने मंगळ्वार पर्यत .मुदतवाढ दिली आहे.

यशवंत मंडईतील गाळेधारकांकडे एक कोटीची थकबाकी असून यापूर्वी त्यांना थकबाकी वसुलीच्या सूचना नोटीसा दिल्या आहेत. मात्र गाळेधारकांनी मुदतवाढ मागितली आहे. त्यानुसार मंगळ्वारपर्यत रक्कम भरणाची संधी देण्यात आली आहे.
-विवेक भदाणे, उपायुक्त, करसंकलन, मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी