31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयमहिलांवर अत्याचार करणाऱ्या भाजपाने नारीशक्तीवर बोलावे हेच आश्चर्य : संध्या सव्वालाखे

महिलांवर अत्याचार करणाऱ्या भाजपाने नारीशक्तीवर बोलावे हेच आश्चर्य : संध्या सव्वालाखे

भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची महिलांबद्दल काय धारणा आहे ते जगाने पाहिले आहे. काँग्रेची विधवा, ५० करोड की गर्लफ्रेंड, दिदी ओ दिली, शर्पूणखा असा उल्लेख करुन महिलांचा अपमान करणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभते का? याचे उत्तर आधी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी द्यावे व नंतर नारीशक्तीच्या अपमानावर बोलावे, असे सडतोड उत्तर काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी दिले आहे.
चित्रा वाघ यांच्या प्रसिद्धीपत्रकाचा समाचार घेत काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे < sandhya savvalakhe > म्हणाल्या की, भाजपाने महिला अत्याचारावर बोलावे हेच आश्चर्यकारक आहे.
(It is surprising that the BJP, which is oppressing women and supporting women abusers, should speak on nari shakti;sandhya savvalakhe.)

ज्या महिला खेळाडूंनी जगात भारताची मान उंचावली त्या महिला खेळाडूंवर लौंगिक अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ब्रिजभूषण सिंह याच्यावर कारवाई का केली नाही. या अत्याचारावर भाजपा गप्प का, चित्राताई वाघ यावर कधीच बोलल्या नाहीत. मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढली, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले त्यावेळ चित्राताई वाघ कुठे होत्या ? काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर बोलणारे भाजपाचेच लोक आहेत. काँग्रेसची विधवा, ५० करोड की गर्लफ्रेंड, शर्पूणखा असे जाहीरपणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांचा सन्मान केला आहे असे चित्राताई वाघ यांना वाटते का? बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कार करून तीच्या घरातील लोकांच्या हत्याप्रकरणी जेलची हवा खात असलेल्या ११ नराधमांना मुक्त करून त्यांचे स्वागत करत मिठाई वाटणे हा नारीशक्तीचा सन्मान वाटतो का?

महिलांबद्दल जर कोणी अपमानास्पद बोलत असेल तर त्याचा निषेधच केला पाहिजे पण महिला अत्याचारावर सोयीस्कर भूमिका घेणे हेही तितकेच निषेधार्ह व घातक आहे. चित्राताई वाघ यांची भूमिका केवळ राजकीय असून हेमा मालिनींचा त्यांना आलेला पुळका इतर महिल्यांवर अत्याचार होतो, नारीशक्तीचा अपमान होतो त्यावेळी कुठे जातो. राहुलजी गांधी यांच्याबद्दल बोलण्याची चित्राताई वाघ यांची पात्रता नाही, आधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांना महिलांबाबात सन्मानाने बोलण्यास सांगावे व नंतर राहुलजी गांधी यांच्याबद्दल बोलावे. शिवसेनेच्या एका मंत्र्यांवर बेछूट आरोप करणाऱ्या चित्राताई वाघ आज त्यांच्याच बरोबर सत्तेत मस्त आहेत, त्यावरही कधीतरी चित्राताईंनी तोंड उघडावे, असे संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या.त्यावरही कधीतरी चित्राताईंनी तोंड उघडावे,असे संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी