30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुढीपाडवा मेळाव्यात नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का : राज ठाकरे

गुढीपाडवा मेळाव्यात नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का : राज ठाकरे

एप्रिल महिन्याच्या उन्हाचे चटके जाणवत असताना लोकसभेची नाशिकची जागाही आता राज्यात ‘हॉट’ ठरू लागली आहे. महाविकास आघाडीने उद्धवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाची घोषणा करत बाजी मारली असतांना महायुतीकडून खासदार हेमंत गोडसे की अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापैकी कोणाचे नाव जाहीर होते याकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच येत्या ९ एप्रिलला शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत
नाशिकच्या जागेचे ‘राज’(Nashik seat of reveal the ‘raj’) उलगडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण, मनसेच्या ट्विटर हँडलवरून गुढीपाडवा मेळाव्याच्या टिझरमध्ये ‘नक्की काय घडलंय, काय घडतंय’ हे प्रत्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सांगणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.(Will Gudi Padwa rally reveal the ‘raj’ of Nashik seat: Raj Thackeray)

त्यामुळे राजकीय अभ्यासकांबरोबरच सर्वांच्याच नजरा त्या सभेकडे लागून आहे. सभेत मोठे खुलासे राज ठाकरे करणार असल्याचे टिझरवरून दिसत आहे.एकीकडे महायुतीतील जागेवरून वादंग सुरू असतानाच दुसरीकडे मनसेनेही लोकसभेच्या नाशिक मतदारसंघावर दावा सांगितला असला, तरी मनसे कोणता उमेदवार आखाड्यात उभा करणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिक व दक्षिण मुंबईतील जागा मिळावी, अशी मनसेची मागणी असल्याची चर्चा असतांनाच नाशिकमध्ये खुद्द राज किंवा अमित ठाकरे(Amit thackeray) यांनी निवडणूक लढवावी, असा मनसे कार्यकर्त्यांचा सूर आहे. याबाबत तसे पत्रही मनसे कार्यकर्त्यांनी राज यांना मध्यंतरी पाठवले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे महायुतीत जाणार का? स्वतंत्र लढणार? की लोकसभा निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार यासाठी गुढीपाडव्याच्या मेळाव्याची वाट पाहावी लागणार आहे.

मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा टिझर लॅान्च केला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय, हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे. अशा ओळीसह राज यांनी मेळाव्याचा टिझर पोस्ट केला आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे – भाजप युती होईल अशी चर्चा होती व ती अजूनही राजकीय गोटात दबक्या आवाजात सुरू आहे.मनसेने यंदा वर्धापनदिनाचा मान नाशिकला दिला. त्यामुळे या मेळाव्यात तरी राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत घोषणा करतील, असे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वाटत होते. परंतु प्रत्यक्षात तशी कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे आता गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी